अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- पाथर्डी शहरासह तालुक्यात व्यवसायाच्या सर्वच क्षेत्रात लॉकडाऊनसह विविध अडचणींमुळे मंदीची लाट तीव्र झाली आहे. जमीन भूखंड घराच्या किमती खाली येत आहे.
दुसऱ्या बाजूने गरजू ग्राहक काळ्याबाजारातील दलालांमुळे अधिक पिळला केला जात आहे. लॉकडाऊन न हटवल्यास सर्वसामान्य, गोरगरीबांसह छोट्या व्यापाऱ्यांमध्ये मानसिक आजाराचे रुग्ण येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे, ही चर्चा बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरला आहे.
गेल्या दीड वर्षापासून बाजारपेठेचे अर्थ चक्र बिघडले आहे. अवैध धंदे राजरोस सुरू मात्र व्यापाऱ्यांवर चोरट्या सारखे जगण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनला पुढे करून दलालांनी तर इंधनाचे भाव वाढल्याचे कारण दाखवत वाहतूकदारांनी दरवाढ केली. त्याचा परिणाम किरकोळ विक्रेते व ग्राहकांवर झाला आहे.
आवश्यक वस्तू जास्त भावा शिवाय मिळत नाही. प्रशासनाची दंडुकेशाही व्यापाऱ्यांवर मात्र अवैध धंदेवाले, काळाबाजार वाले राजरोस व्यवहार करतात. परिस्थिती अनिश्चित आहे याची भीती बाळगून वाटेल त्या भावात ग्राहक माल घेऊन बसला.
गल्लोगल्ली फिरून हात जोडून विनवणी करत शेतकरी मातीमोल भावात मालक विकतो तर दुसऱ्या कोपऱ्यात मावा दारू विक्री करणारा मन मानेल त्या भावाने माल विकतो. येथे मोठी गर्दी असते. आता वैयक्तिक व सार्वजनिक अर्थचक्र बिघडले आहे.
सामान्यांच्या हाती पैसा नाही. पगारदार वर्ग पैसा सांभाळत असून बाजारपेठेत वर्दळ कमी झाली आहे. गेल्या पंधरा दिवसात ग्राहकांची गर्दी कमी अन रस्त्यावर फिरणाऱ्या, घरात बसून करमत नाही म्हणून घराबाहेर पडणार्यांची संख्या वाढली आहे.
लॉकडाऊनमागे घेतल्यास दोन दिवसानंतर बाजारपेठेत अगदी शुकशुकाट होईल, एवढी नाजूक स्थिती आजच बनली आहे. बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले. परप्रांतीय मजूर निघून गेले. त्यामुळे बांधकामे जवळजवळ बंद आहेत.
जमिनीच्या व भूखंडाच्या व्यवहाराला ग्राहक नाही. मागील वर्षी सर्वसाधारणपणे जो बाजार भाव होता त्यामध्ये सुमारे २५ टक्के किमतीची घसरण होऊन खरेदी-विक्रीचे शासकीय व्यवहार कोरोनामुळे ठप्प असल्याने जवळजवळ व्यवहार बंद आहेत