ताज्या बातम्या

Driving Tips : स्पीड कमी-जास्त केला तर स्टीयरिंग व्हील थरथरण्यामागचे असू शकते ‘हे’ कारण, दुर्लक्ष करू नका

Published by
Ahmednagarlive24 Office

Driving Tips : रस्त्यांवर तुम्हाला अनेक वाहने दिसत असतील. देशात वाहतुकीचे नियम खूप कडक केले आहे. परंतु तरीही अपघात घडतात. अनेकदा हे अपघात त्या वाहनातील दोषांमुळे होतात. बऱ्याचदा आपण कार चालवत असताना कारचा स्पीड कमी जास्त करतो.

परंतु, अनेक कारमध्ये असे केले की स्टीयरिंग व्हील थरथरू लागते. जर तुमच्याही कारबाबात असे होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण यामागे मोठेही कारण असू शकते. वेळीच याकडे लक्ष द्या नाहीतर तुम्ही खूप मोठ्या संकटात सापडू शकता.

सपाट टायर

यामागचे सर्वात मोठे आणि अगदी सामान्य कारण म्हणजे कारचा सपाट टायर. त्यामुळे टायरवर खूप दबाव येतो. अनेकदा अपघातही होतात.

चाकांचा समतोल

प्रत्येक वाहनासाठी चाकांचा समतोल खूप गरजेचा आणि महत्त्वाचा असतो. समतोल नसेल तर गाडी चालवताना त्रास होतोच, तसेच त्याचा चाकांवरही परिणाम होतो. त्यामुळे स्टीयरिंग व्हील थरथरते.

बॉल जॉइंट्स

कारमधील बॉल जॉइंट्स फ्रंट व्हील सस्पेंशन आर्म्सला व्हील हबशी जोडत असून ते सस्पेंशनला पॉवर देतात. जेव्हा हे सांधे तुटतात, तेव्हा सस्पेंशनला खूप जास्त किंवा खूप कमी प्रतिकार होतो. त्यामुळे स्टीयरिंग व्हील थरथरते.

व्हील बेअरिंग तुटणे

बियरिंग्समुळे चाके व्यवस्थित चालतात. जेव्हा बेअरिंग तुटते तेव्हा चाकांमध्ये समस्या येते. त्यामुळे स्टीयरिंग व्हील थरथरते.

Ahmednagarlive24 Office