अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- रोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्यांची संख्या 40 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत चार लाख लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, अमेरिकेतील साथरोग विशेषज्ञ डॉ. अँथनी फौची यांनी अलीकडेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 99.2 टक्के लोक असे आहेत ज्यांनी कोरोना लस घेतलेली नव्हती, असे म्हटले आहे.
हे मृत्यू खूपच निराशाजनक आहेत कारण ते टाळता आले असते असे डॉ. अँथनी फौची यांनी सांगितले आहे. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, कोरोनाच्या रूपातील धोकादायक शत्रू आपल्यासमोर असताना आणि त्याच्यावरील गुणकारक उपाय असतानाही दुर्दैवीपणे देशभरात त्यांची अंमलबजावणी होत नाही हे निराशाजनक आहे.
जर लस वेळेत आली असती तर जगभरातील अनेक मृत्यू टाळता आले असते, असेही ते म्हणाले. डॉ. अँथनी फौची यांनी यावेळी अमेरिकेतील काही नागरिकांकडून होणाऱ्या विरोधावरून टीका करताना काही विचारवंत लसविरोधी आहेत
की विज्ञानविरोधी आहेत अशी विचारणा केली आहे. डॉ. अँथनी फौची यांनी लोकांना कोरोना हा प्रत्येकाचा शत्रू आहे हे समजून घ्या अशी विनंती केली आहे.
पर्याप्त लसीचे डोस उपलब्ध असल्याने अमेरिका भाग्यवान आहे. अमेरिकेतील सर्व लोकांचे लसीकरण होऊ शकते इतके डोस उपलब्ध आहेत, असे सांगताना अँथनी फौची यांनी काही देशातील लोक लस मिळण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.