अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे जनतेचे सरकार आहे. या सरकारने आत्तापर्यत कधीही निळवंडे धरण व कालव्यांच्या कामांना निधी कमी पडू दिला नाही.
आता प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय कॅनालच्या कामात संगमनेरची पाइपलाईन हलवून जलसेतूचे उर्वरीत दोन कॅालम एका महिन्यात पूर्ण करावेत. नंतर आंदोलक स्वतः पाइपलाइन उखडून फेकतील.
कॅनालचे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे, या गतीने कामे पूर्ण करावीत, अशा सूचना आमदार किरण लहामटे यांनी पाणी हक्क संघर्ष समिती आयोजित मोर्चात दिल्या.
निळवंडे धरणाचे कालव्यांच्या कामाला गती मिळावी म्हणून सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी शुक्रवारी पाणी हक्क मोर्चा काढला. महात्मा फुले चाैकातून हा मोर्चा बाजारतळावर जाहीर सभा झाली.
अध्यक्षस्थानी जेष्ठ शेतकरी खंडूबाबा वाकचाैरे होते. याप्रसंगी आमदार लहामटे बोलत होते. यावेळी अजित नवले, कारभारी उगले, मच्छिंद्र धुमाळ, सीताराम भांगरे, जालिंदर वाकचाैरे, विनय सावंत, महेश नवले, रवींद्र गोर्डे, पर्बत नाईकवाडी, गिरजाजी जाधव,
मच्छिंद्र मंडलिक, सुरेश खांडगे, अप्पासाहेब आवारी, स्वाती शेणकर, प्रमोद मंडलिक, भाग्यश्री आवारी, जे. डी.आंबरे, कविराज भांगरे, निता आवारी, किरण गजे, सुरेश भोर उपस्थित होते. आमदार लहामटे म्हणाले, तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणी टंचाई आहे.
धामणगाव आवारी, अंबड, वाशेरे, औरंगपूरचे लोक उच्चस्तरीय कालव्याच्या पाण्याची वाट पाहत आहेत. निळवंडेचा पहिला जलसेतू मंजूर असताना नंतर संगमनेरची पाईपलाईन गेली. लवकरच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर आंदोलकांची बैठक आयोजित करु, असेही आमदार लहामटे म्हणाले.