Best Broadband Plan : ऑफर असावी तर अशी! 3 रुपयांत मिळतोय दिवसाला 3300GB डेटा

Best Broadband Plan : भारत संचार निगम लिमिटेड ही सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. जर फिक्स्ड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेचा विचार केला तर सर्वात अगोदर BSNL चे नाव डोळ्यासमोर येते.

ही कंपनी वेगवेगळ्या किमतीत वेगवेगळे प्लॅन ऑफर करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही प्लॅन ग्राहकांच्या खिशाला परवडणारे आहेत. BSNL च्या या ब्रॉडबँड प्लॅनबद्दल जाणून घेऊयात सविस्तर.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

1. 275 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या 275 रुपयांच्या प्लॅनमध्ये 75 दिवसांची वैधता आहे. यामध्ये अमर्यादित कॉलिंगसह 3300GB डेटा मिळतो. 275 रुपयांच्या दोन प्लॅनमध्ये फरक फक्त डेटा स्पीडचा असून एका प्लॅनमध्ये तुम्हाला 30 Mbps स्पीड तर दुसऱ्यामध्ये तुम्हाला 60 Mbps स्पीड मिळेल. दोन्ही प्लॅनमधील इंटरनेट मर्यादा संपल्यानंतर तुमचा इंटरनेट स्पीड 4 Mbps पर्यंत कमी होईल. तसेच तुम्हाला कोणत्याही योजनेअंतर्गत OTT प्लॅटफॉर्मचे फायदे मिळत नाहीत.

2. 329 रुपयांचा प्लान

BSNL च्या 329 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये तुम्हाला 20 Mbps इंटरनेट स्पीड आणि 1000GB पर्यंत डेटा मिळतो. FUP डेटा पूर्ण झाल्यानंतर वेग 4 Mbps पर्यंत कमी होतो. तसेच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत आहे.

3. 399 रुपयांचा प्लॅन

399 रुपयांच्या BSNL Fiber Experience FTTH प्लॅनमध्ये तुम्हाला 1000GB डेटा कॅप आणि 30 Mbps डाउनलोड स्पीड मिळतो. 1000GB ची मर्यादा गाठल्यानंतर, डेटा स्पीड 4 Mbps पर्यंत कमी होतो. तसेच  प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

4. 449 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 449 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये तुम्हाला 30 Mbps स्पीडमध्ये 3300GB पर्यंत डेटा मिळतो. यामध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते.

5. 499 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 499 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये तुम्हाला 40 Mbps स्पीड आणि 3300GB पर्यंत हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळत आहे. तसेच इतर प्लॅनप्रमाणे या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.