अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- पोलीसांना पोलीसांना जर दारु अड्डे सापडत नसतील तर तुमची वर्दी आम्हाला द्या आम्ही सर्व महिला ३ तासात सर्व दारु आड्डे उध्वस्त करुन दाखवतो.
छापा मारण्यापुर्वी पोलीस ठाण्यातुन दारू विकणाऱ्याना फोन येतो, हप्ते घेण्यासाठी पोलीसांना दारु अड्डे सापडतात मग कारवाईसाठी का नाही. प्रसादनगर भागातील दारु अड्डे बंद न झाल्यास जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा राहुरी फॅक्टरी येथील संतप्त महिलांच्या वतीने आंदोलनकर्त्या रजनी कांबळे यांनी दिला आहे.
फँक्टरी येथील प्रसाद नगर भागात हातभट्टी दारु अड्डे मोठ्या असुन या दारुमुळे या भागातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने.संतप्त महिलांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निवेदन देवून 48 तासात दारु धंदे व खाजगी सावकारकी बंद करण्याची मागणी केली होती
परंतु कुठलीही कारवाई न झाल्याने नगर मनमाड महामार्गावरील आंबेडकर चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. संतप्त महिलांनी नगर मनमाड महामार्ग अडविल्या नंतर दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या
आंदोलन स्थळी पोलीस उप निरीक्षक तुषार धाकराव हे आले आणि त्यांनी आंदोलकांना पोलीसी भाषेत रस्त्यावरुन उठण्यास सांगितले. तुमचे प्रश्न काय असतील ते नंतर पाहु वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करुन द्या अशी भूमिका घेतली
या आंदोलनात विजया निकाळजे, मालती कदम कविता साळवे,ताई बोर्डे,अलका पठारे,रंगुबाई मोकळ,सुवर्णा मोकळ,पल्लवी पवार,हेलनबाई गायकवाड,पुष्पा बोराडे,सुनिता पवार, रेखा जगताप संगिता वाल्हेकर मनिषा अल्हाट,
अंजु बोराडे,मंगल थोरात,मिना अल्हाट,सारीखा ओहळ,रंजना कांबळे आदि महिला सहभागी झाल्या होत्या.