Samsung smartphone offer : ऑफर असावी तर अशीच…! अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा सॅमसंगचा हा 5G फोन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung smartphone offer : दिग्ग्ज टेक कंपनी सॅमसंग आता आपले 5G स्मार्टफोन बाजारात लाँच करत आहे. या सर्वच स्मार्टफोनमध्ये कंपनी शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन देत आहे. त्यामुळे आता सॅमसंगच्या स्मार्टफोन विकत घ्यायचे असतील तर तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागत आहे.

असे असतानाही तुम्ही आता खूप स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू शकता. तुम्ही म्हणाल अशी ऑफर कुठे मिळत आहे? तर अशी भन्नाट ऑफर Amazon वर मिळत आहे. या सेलमधून तुम्ही आता Samsung Galaxy S20 FE 5G हा स्मार्टफोन अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

फोनवर मिळत आहे 45 हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट

या फोनची Amazon वर किंमत 74,999 रुपये आहे. या फोनवर 45 हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर या फोनची किंमत 29,999 रुपये इतकी होते. तर दुसरीकडे, बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार केला तर, तुम्हाला 1,500 रुपयांपर्यंत सूट तसेच जुन्या फोनसाठी 18,555 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. हे लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरचा फायदा तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.

1TB पर्यंत वाढवता येत आहे स्टोरेज

सॅमसंग आपल्या फोनमध्ये 1080X2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असून या फोनच्या डिस्प्लेला 120Hz चा रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. तर या 5G फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 ऑक्टा-कोर चिपसेट प्रोसेसर म्हणून दिला आहे. Android 11 वर आधारित, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे.

कॅमेरा

दुसरीकडे, या सॅमसंग फोनमध्ये 12MP प्राथमिक कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 8MP थर्ड सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा कंपनीने दिला आहे. इतकेच नाही तर या फोनमध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, WiFi, Bluetooth 5.0 आणि USB Type-C पोर्ट दिले आहेत.