‘या’ गोष्टी ४८ तासात बंद न झाल्यास महिला करणार रास्तारोको

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  राहुरी फॅक्टरी परिसरामधील अवैध हातभट्टी दारू व्यवसाया बरोबरच खाजगी सावकारकी त्वरित बंद व्हावी या मागणीसाठी राहुरी फॅक्टरी

येथील प्रसादनगर परिसरातील संतप्त महिलांच्या वतीने सोमवार दिनांक १२ जुलै रोजी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात असे म्हटले आहे की,प्रसादनगर भागासह राहुरी फॅक्टरी परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू व्यवसायासह बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून

संबंधित व्यवसायीक हे गुंड प्रवृत्तीचे असल्याने परिसरात नेहमीच दहशतीचे वातावरण असते.त्यातच काही व्यवसायिकांनी प्रसादनगर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हातभट्टी व्यवसाय सुरू केल्याने

दारू पिणारे आंबेडकर पुतळ्याजवळ कायम घुटमळत असल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.याबाबत वेळोवेळी पोलीस प्रशासनाला लेखी व तोंडी स्वरूपाच्या तक्रारी केल्या असून

स्थानिक पोलिस प्रशासन व अवैध व्यवसायिक यांचे असलेले अर्थपूर्ण संबंध यामुळे सदर व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. तरी प्रसादनगर परिसरातील अवैध हातभट्टी दारू व्यवसायाच्या बरोबरच अवैध सावकारकी येत्या ४८ तासांत बंद न केल्यास

दिनांक १५ जुलै रोजी राहुरी फॅक्टरी येथील डॉ.आंबेडकर चौकात रास्ता रोको करणार असल्याचे संतप्त महिलांच्या वतीने सांगण्यात आले. निवेदनावर मालती कदम, कविता साळवे,ताई बोर्डे,अलका पठारे,

रंगुबाई मोकळ,सुवर्णा मोकळ,पल्लवी पवार,हेलनबाई गायकवाड,आदि महिलांच्या सह्या आहेत.

सदर निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर,पोलीस उपअधीक्षक श्रीरामपूर विभाग,जिल्हा अधीक्षक दारूबंदी उत्पादन शुल्क अहमदनगर यांना देण्यात आले आहेत

अहमदनगर लाईव्ह 24