वीज कनेक्शन तोडाल, तर आक्रमक भूमिका घेऊ..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  विधानसभा अधिवेशनात कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नका असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश असतांनाही कोपरगाव मतदारसंघात अनेक ठिकाणी वीजवितरण कर्मचारी हे शेतकरी बांधवांची पिळवणूक करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

त्यामुळे तात्काळ शासन आदेश मान्य करून विजवितरणाने कृषी पंपाचे विज कनेक्शन तोडणे थांबवावे अन्यथा शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ज्या शेतकरी बांधवांची वीज बिल देयके थकीत आहेत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम विज वितरण कंपनी करत असल्याने

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडणी संदर्भात विधानसभेत सरकारला धारेवर धरत वीज कनेक्शन तोडणीमुळे शेतकरी बांधव, उद्योग व्यवसायिक आणि सामान्य नागरिकांचे होणारे

नुकसान व समस्या यांच्यावर तात्काळ निर्णय घ्या आणि वीज कनेक्शन तोडणे त्वरीत थांबवा अशी भूमिका घेत शासनाला कोंडीत पकडून अखेर निर्णय घेण्यास भाग पाडुन ज्यांचे या पूर्वी वीज कनेक्शन तोडले आहे

त्यांचेही पूर्ववत करा अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली. जगासह देशावर कोरोना माहमारीचे संकट असतांना आमचा शेतकरी राजा आर्थिक दृष्टीने खचून गेलेला असताना उभारी देण्याऐवजी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम ही कंपनी करत आहे, असे कोल्हे म्हणाले.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24