ताज्या बातम्या

Car Insurance : तुमच्याकडेही असेल कार तर आजच करा विम्याचे काम, नाहीतर बसेल तुम्हाला आर्थिक फटका

Published by
Ahmednagarlive24 Office

Car Insurance : भारतात रहदारीच्या नियमांमधील सर्वात महत्त्वाचा एक नियम म्हणजे इन्शुरन्स. जर आपल्याकडे इन्शुरन्स नसेल तर आपण इन्शुरन्सशिवाय कोणतंही वाहन चालवू शकत नाही. इन्शुरन्स हा लोकांच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा तर आहेत.

परंतु, तो वाहनांसाठी देखील खूप गरजेचा आहे. वाहन खरेदी करत असताना इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यानंतर त्याकडे कमी लोक लक्ष देतात. इतकेच नाही तर जेव्हा या इन्शुरन्सची वैधता संपते त्यानंतर काहीजण ते रिन्यू करत नाही. परंतु, जर तुम्ही अजूनही इन्शुरन्स घेतला नसेल तर आजच ते काम पूर्ण करा कारण तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

कंपन्यांचे पॉलिसी कोटेशन मिळवा

जर तुम्हाला तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीचे नूतनीकरण करायचे असल्यास किंवा नवीन कारसाठी पॉलिसी घ्यायची असल्यास, कोणत्याही कंपनीकडून पॉलिसी घेण्याअगोदर तुम्हाला एकापेक्षा जास्त कंपन्यांचे पॉलिसी कोटेशन घेता येते. तुम्ही यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अॅपचीही मदत घेऊ शकता.

इन्शुरन्स फरक पहा

तसेच प्रत्येक वेळी पॉलिसीचे नूतनीकरण करत असताना, हे लक्षात ठेवा की पॉलिसीचे नूतनीकरण करण्याअगोदर केवळ एकाच कंपनीकडे इतर पर्याय बघून, तुम्हाला कमी किमतीत चांगली डील मिळण्याची शक्यता असते. काहीवेळा कारचे मूल्य आणि प्रीमियममध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असते.

टर्म कंडिशनची काळजी घेणे गरजेचे

इतकेच नाही तर कोणतीही पॉलिसी फायनल करण्यापूर्वी, त्याची टर्म आणि कंडिशन वाचा. नेहमी त्याच कंपनीची पॉलिसी निवडा, जी तुमच्या सर्व गरजा पूर्ण करत असेल.

सीएसआर तपासून घ्या

CSR म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशो होय. कोणत्याही कंपनीची पॉलिसी फायनल करण्यापूर्वी, त्या कंपनीने एका वर्षात किती दावे निकाली काढले हे नक्की तपासा. तुमच्यासाठी एका वर्षात जास्तीत जास्त CSR सेटल केलेल्या कंपनीची पॉलिसी घेणे फायदेशीर आहे.

बरोबर माहिती द्या

हे लक्षात ठेवा की पॉलिसीचे नूतनीकरण करत असताना कधीही चुकीची माहिती देऊ नका. जर तुम्ही असे केले तर, नंतर गरज पडल्यास कंपनी तुम्हाला दावा देण्यासही नकार देईल. अनेक जण कार विम्याच्या नूतनीकरणाच्या वेळी NCB इत्यादीबद्दल चुकीची माहिती देतात, ज्यामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान होते.

Ahmednagarlive24 Office