Investment Tips : तुम्हीही अशी गुंतवणूक केली तर व्हाल करोडपती, कसे ते जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Investment Tips : भविष्यात श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी पैसे वाचवणे खूप गरजेचे आहे. यापैकी काहीजण पैसे वाचवतात तर काहीजण गुंतवणूक करतात. परंतु, जर तुम्ही गुंतवणूक योग्य ठिकाणी केली तर तुम्हाला परतावा जास्त मिळतो.

तसेच परतावा किती मिळेल हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. जर तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर बातमी शेवटपर्यंत वाचा. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर श्रीमंत होऊ शकता.

या ठिकाणी करता येते गुंतवणूक 

सोन्यात गुंतवणूक

चांगल्या परताव्यासाठी तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता. कारण सतत सोन्याचे भाव वाढत राहतात, त्याचा तुम्हाला येणाऱ्या काळात चांगला फायदा होईल. तसेच सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते.

शेअर बाजार जसजसा घसरतो, तसतसा सोन्याचा भावही कमी होतो. म्हणून सोने चांगला परतावा देऊ शकते.

असा होईल फायदा

जर तुम्हाला जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्ही गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. तसेच तुम्ही तुमचे सोने सुरक्षित करू शकता.

जर तुम्ही दागिने बनवलेत, तर सोन्याची वजावट होत नाही. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक म्हणजे सोने खरेदी करण्यासारखेच आहे. गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे थेट खाण कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office