ताज्या बातम्या

Twitter Blue Tick : तुम्हालाही घ्यायची असेल ब्लू टिक तर फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Twitter Blue Tick : देशात ट्विटरचे वापरकर्ते खूप आहेत. ट्विटरही आपल्या वापरकर्त्यांसाठी वेगवेगळे फीचर्स आणत असते. लवकरच ट्विटरचा यूजर इंटरफेस बदलला जाणार आहे.

जर तुम्हाला ट्विटर ब्लू टिक मिळवायची असेल तर बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही आता सोप्या प्रोसेसमध्ये मिळवू शकता. जाणून घेऊयात संपूर्ण पद्धत.

किंमत

जर तुम्हाला ब्लू टिक पाहिजे असेल, तर आता तुम्हाला दर महिन्याला ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला $8 मोजावे लागतील. अजूनही भारतात ट्विटर ब्लू लॉन्च झाले नाही, परंतु काही वापरकर्ते व्हीपीएनद्वारे ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घेत आहेत.

अशी मिळवा ब्लू टिक

ब्लू टिकसाठी, तुम्हाला ट्विटरवरील तुमच्या खात्यात लॉग इन करावे लागणार आहे. तुम्हाला सर्च इंजिन गुगलवर जाऊन व्हीपीएन डाउनलोड करावे लागेल. नंतर तुमचा सर्व्हर भारतातून इतर कोणत्याही देशात बदलला तर, तुम्हाला तुमच्या ट्विटरच्या खाली ‘ट्विटर ब्लू’ पर्याय दिसेल.

त्यानंतर तुम्हाला विचारलेले तपशील भरावे लागतील. तसेच तुम्हाला पेमेंट संबंधित तपशील भरावे लागतील आणि विचारलेल्या पत्त्यावर भारताऐवजी तुम्हाला यूएसए किंवा तुम्ही जिथे कुठेही स्थान प्रविष्ट करून त्याची माहिती द्यावी लागेल.

हे लक्षात ठेवा की पेमेंट तपशील भरताना, पत्ता आणि पिनकोड काळजीपूर्वक प्रविष्ट करा. त्यांतर तुम्हाला Twitter वरून तुम्हाला तुमचे Twitter Blue चे सदस्यत्व यशस्वी झाले असल्याचे समजेल.

फिचर्स

ट्विटर ब्लूमध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. यामध्ये तुम्हाला टॉप ट्रेंड, टॉप न्यूज, लाँग व्हिडीओज मिळतील, तुम्ही फुल एचडी मध्ये व्हिडिओ देखील अपलोड करू शकता. याशिवाय, ट्विटर ब्लूमध्ये तुम्हाला अनडू ट्विट आणि ट्विट संपादित करू शकता. Twitter ब्लूसाठी पैसे भरले की तुम्हाला लगेच ब्लू बॅज मिळत नाही. तुम्हाला ७ दिवस वाट पाहावी लागते.

VPN वापरून Twitter Blue चे सदस्यत्व घेतले आणि Twitter ने तुमचा पत्ता तपासला आणि तो चुकीचा सापडला तर तुमचे Twitter Blue चे सदस्यत्व रद्द केले जाईल.

त्यामुळे विचार करूनच व्हीपीएनद्वारे ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घेऊ शकता. आगामी काळात जेव्हा ट्विटर ब्लू भारतात लॉन्च होईल तेव्हा ते अमेरिकेपेक्षा कमी किमतीत भारतात लॉन्च केले जाऊ शकते.

Ahmednagarlive24 Office