ताज्या बातम्या

Tax Saving Scheme : तुम्हालाही कर वाचवायचा असेल तर करू शकता ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक, जाणून घ्या कर बचतीचा कानमंत्र

Published by
Ahmednagarlive24 Office

Tax Saving Scheme : अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ केली आहे. परंतु, या वेतनवाढीसोबतच अनेकजण कराच्या कक्षेत आले आहेत.त्यामुळे तुम्हालाही इतरांप्रमाणे कर भरावा लागेल आणि जर तुम्ही कर भरला नाही तर तुम्हालाही दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.

अशातच आता कर कसा वाचवायचा हे तुम्हाला माहित असले पाहिजे, अशी काही योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचा कर मोठ्या प्रमाणात वाचू शकतो. सर्वात महत्त्वाचे या सर्व योजना सरकारी असून त्यात परतावा जास्त मिळत आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

आता तुम्ही तुमचे पैसे पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये 15 वर्षांसाठी गुंतवू शकता. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता.

ही एक छोटी बचत योजना असून जी EEE श्रेणी अंतर्गत येत आहे. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.1 टक्के व्याज मिळत आहे. इतकेच नाही तर यात आयकर कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभही मिळतो.

सुकन्या समृद्धी योजना

मुलींना कर लाभ मिळवण्यासाठी तुम्ही तुमचे पैसे सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवू शकता. ही योजना 2015 साली सुरू केली असून आता या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 7.6 टक्के इतके व्याज मिळत आहे. जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली तर कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभही मिळतो.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही एक लहान बचत योजनाअसून जर तुम्ही कलम 80C अंतर्गत या योजनेत गुंतवणूक केल्यानंतरही तुम्हाला कर लाभ मिळतात. सध्या या योजनेत गुंतवणुकीसाठी 7 टक्के इतके व्याज देण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office