आपण एलआयसीचे ग्राहक असाल तर जाणून घ्या ‘हा’ बदललेला नियम, सरकारने केला बदल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसीने आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार केंद्र सरकारने जाहीर केले की आता एलआयसीसाठी प्रत्येक शनिवार सार्वजनिक सुट्टी मानली जाईल.

म्हणजेच, प्रत्येक शनिवारी एलआयसीसाठी सुट्टी असेल. निगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स अ‍ॅक्ट 1881 च्या कलम 25 अंतर्गत मिळालेल्या सामर्थ्यावर आधारित सरकारने हा बदल केला आहे.

याचा अर्थ असा आहे की जर आपल्याला एलआयसीच्या कार्यालयात जायचे असेल आणि काही काम असेल तर आपल्याला फक्त सोमवार ते शुक्रवार दरम्यानच जावे लागेल कारण शनिवार आणि रविवारची सुट्टी असेल, ज्यामुळे कार्यालय बंद असेल.

जर तुम्हीही एलआयसीचे ग्राहक असाल आणि एलआयसीच्या कार्यालयात जाऊन काही काम करावयाचे असेल तर त्यादृष्टीने तुमचे नियोजन करा.

थकबाकीदार वेज रिवीजनमध्ये चांगली बातमी – एलआईसी कर्मचार्‍यांचे 1 ऑगस्ट, 2017 पासून वेज रिविजन थकबाकी आहे. वेज रिवीजन दरम्यान, आठवड्यात मिळाली ही अतिरिक्त सुट्टी एलआयसी कर्मचार्‍यांसाठी आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही.

संघटनेच्या एका नेत्याने सांगितले की एलआयसीच्या इतिहासात प्रथमच असे झालेय की, वेज रिविजनला इतका वेळ लागला आहे.

युनियन नेत्यांशी बैठक घेतल्यानंतर व्यवस्थापनाचा अंतिम प्रस्ताव सरकारकडे पाठविला जाईल आणि अधिसूचना जारी करण्यापूर्वी अर्थ मंत्रालय यात बदल करू शकेल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24