UPI : स्मार्टफोनमुळे सगळे जग जवळ आले आहे. आता अनेक कामे चुटकीसरशी होत आहेत. स्मार्टफोनमुळे सध्या अनेक पेमेंट हे Paytm, PhonePe आणि GPay यांसारखी UPI पेमेंट अॅप्सने करत आहेत. अॅप्सने व्यवहार जरी सहज होत असले तरी तितकाच गुन्हेगारांचा धोकाही वाढत आहे.
त्यामुळे UPI ने पेमेंट करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही UPI ने पेमेंट करताना काही चुका करत असाल तर तुमच्या अकाउंटमधून काही मिनिटात लाखो रुपये गायब होतील. त्यामुळे डिजिटल व्यवहार करत असताना कोणत्या चुका करू नये ते जाणून घ्या.
सतत अॅप अपडेट करा
ज्या अॅपवरून तुम्ही UPI व्यवहार करता. ते सतत अपडेट करावे. कारण या अपडेटनंतर, अॅपशी निगडित सुरक्षा त्रुटी दूर होतात, ज्यामुळे वापरकर्त्यांचे डिजिटल व्यवहार सुरक्षित होतात.
UPI पिन कोणालाही देऊ नका
जर तुम्ही तुमचा UPI पिन कोणाशीही शेअर केला तर तुमचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही तुमचा UPI पिन कुणासोबत शेअर केला तर त्याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे.
अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळा
सध्या युजर्सच्या मोबाईलवर अज्ञात लिंक पाठवून सायबर फसवणूक मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे आपण सावध राहणे आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्या अज्ञात लिंकवर क्लिक करताच तुम्हाला UPI पेमेंट करण्यास सांगितले जात असेल तर चुकूनही पेमेंट करू नये.
तुम्ही त्या लिंकचा टॅब ताबडतोब बंद करून टाकावा. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.तसेच तुम्ही डिजिटल व्यवहार करण्यासाठी नॉनव्हेरिफाईड UPI अॅप्स वापरू नयेत.