Used car : जुनी कार खरेदी असाल तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर अडचणीत याल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Used car : बाजारात सतत नवनवीन कार्स येत असतात. यापैकी काहींच्या किमती खूप असतात. अशातच आता नवीन वर्षात सर्व कार्स महाग होणार आहेत. काहीजण नवीन कार महाग असल्याने जुनी कार खरेदी करतात.

जर तुम्हीही जुनी कार खरेदी करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर अडचणीत याल. काही गोष्टींकडे लक्ष न दिल्याने तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

लक्षात ठेवा या गोष्टी

क्रमांक 1

कोणत्याही वाहनासाठी इंजिन गरजेचे असते.त्यामुळे तुम्ही जुनी कार खरेदी करत असाल तर सर्वात अगोदर इंजिन तपासा. जर तुमच्या सोबत एक मेकॅनिक असेल तर उत्तमच. इंजिन न पाहताच कार घेतली तर तुम्हाला फटका बसू शकतो.

क्रमांक 2

तसेच त्या कारचे इंजिन ऑइल व्यवस्थित तपासा. ऑइलशिवाय गाडी चालवले तर इंजिन खराब होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागेल.

क्रमांक 3

जुन्या कारची कागदपत्रे म्हणजेच आरसी, पीओसी आणि विमा यांसारखी कागदपत्रे नीट चेक करा. त्याशिवाय 15 वर्षांपेक्षा जुनी असलेली कार खरेदी करू नका. नाहीतर तुमचे चलन कापले जाईल.

क्रमांक 4

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती कार तुटली किंवा तिची लाईट यांसारख्या गोष्टी पहा. जर यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्याचे पैसे कमी करून घ्या.