Guidelines for Cash : घरी रोख रक्कम ठेवत असाल तर जाणून घ्या ‘हे’ नियम

Guidelines for Cash : अनेकजण आपले पैसे बँक खात्यात, शेअर मार्केट किंवा शासनाच्या एखाद्या योजनेत गुंतवतात. काहीजण आपल्या घरीच रोख रक्कम ठेवतात.

परंतु, सरकार या पैशांवर मर्यादा घालते अशा बातम्या काही दिवसांपूर्वी वाचल्या असतील. परंतु, कैन्सर सरकार अशा कोणत्याही मर्यादा घालत नाही. मात्र तुम्हाला या प्रत्येक पैशाचा हिशोब द्यावा लागतो. जाणून घेऊयात सविस्तर नियम.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

प्रत्येक पैशाचा ठेवा हिशोब

भारत एक विकसनशील अर्थव्यवस्था आहे त्यामुळे यासाठी किमान मर्यादा निश्चित करणे कठीण जाईल, असे तज्ज्ञांचे मत होते. परंतु, तुमच्या घरी रोख रक्कम ठेवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही किंवा असा कोणताचा नियम नाही की ज्याच्या अंतर्गत तुम्हाला रोख रक्कम ठेवावी लागेल.

तुम्ही पाहिजे तेवढी रोख रक्कम ठेवू शकता. ही रक्कम ठेवत असताना एकच लक्षात ठेवावा की तुमच्या उत्पन्नाचा स्रोत आणि तुम्ही कर भरला आहे की नाही?

कमाल रोख व्यवहार मर्यादा

भारतीय अर्थव्यवस्थेत रोख व्यवहार हे परंपरेने महत्त्वाची भूमिका बजावतात आणि काळा पैसा जमा होण्याचे ते सतत कारण असतात. सरकारने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी वेळोवेळी रोख व्यवहारांवर विविध मर्यादा विहित केल्या आहेत. जर कोणी या मर्यादेपेक्षा जास्त रोख रक्कम भरल्यास किंवा प्राप्त केल्यास भरलेल्या किंवा प्राप्त झालेल्या रकमेच्या सुमारे 100 टक्के इतका मोठा दंड ठोठावला जातो.

कोणत्याही कारणास्तव भारताचे आयकर कायदे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार करण्यास प्रतिबंधित करतात. म्हणजे, जर तुम्ही एकाच व्यवहारात ₹ 3 लाख किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी करत असाल तर तुम्हाला चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा बँक ट्रान्सफरद्वारे पेमेंट करावे लागेल.