Saving Account Rule: तुमचेही बचत खाते आहे व तुम्ही त्याचा वापर करत नाहीत? ताबडतोब बंद करा अशी खाती, नाहीतर…

Published by
Ajay Patil

Saving Account Rule:- प्रत्येक नागरिकांचे बँकेत खाते असते. प्रधानमंत्री जनधन योजना कार्यान्वित  झाल्यापासून अगदी तळागाळातील लोकांचे देखील बँकेत खाते आहेत. यामध्ये आपल्याला बऱ्याचदा दिसून येते की काही व्यक्तींचे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये सेविंग अकाउंट असतात आणि हा प्रकार प्रामुख्याने व्यावसायिक किंवा पगारदार व्यक्तींच्या बाबतीत जास्त दिसून येतो.

परंतु जरी एकापेक्षा जास्त बँकांमध्ये बचत खाते असले तरीदेखील  काही निवडक बँक खात्यांचा वापर काही व्यक्ती करताना आपल्याला दिसून येतात व बरीच खाती ही वापरावीना तसेच पडून राहतात म्हणजेच ते वापरात नसतात.

परंतु अशा प्रकारची खाती ही आपल्या फायद्याचे नसून ती नुकसान करणारीच ठरतात. त्यामुळे जर तुमचे देखील एका पेक्षा जास्त बँकांमध्ये बचत खाते असतील व तुम्ही ती वापरत नसाल तर अशी खाती बंद करणे तुमच्या हिताचे ठरते.

जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला आर्थिक नुकसान तर होतेच परंतु अनेक समस्यांना तोंड देखील द्यावे लागू शकते. त्याविषयीची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.

 वापरात नसलेल्या बँक खात्यामुळे होणारे नुकसान

1- मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे- तुमचे एका पेक्षा जास्त बचत खाते आहेत व तुम्ही त्यांचा वापर करत नसाल तरी देखील अशा बचत खात्यांमध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे असते. हा नियम सर्व बँकांच्या नियमित बचत खात्यांवर लागू आहे.

त्यामुळे तुम्हाला एक तर तुमच्या बचतीचा काही भाग संबंधित खात्यामध्ये मिनिमम बॅलन्सच्या रूपात ठेवावा लागतो  किंवा मिनिमम बॅलन्स नाही ठेवला तर बँकेच्या माध्यमातून दंड म्हणून काही रक्कम कापली जाऊ शकते.

2- डेबिट कार्ड शुल्काचा भुर्दंड भरावा लागतो- जरी तुम्ही असे सेविंग अकाउंट वापरात नसाल तरी देखील तुम्हाला त्या बँकेची डेबिट कार्ड फी भरणे अनिवार्य असते व हे भरावे लागणारे शुल्क निष्क्रिय खात्यातून मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असण्याची शक्यता असते.

बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारचे शुल्क नाही लागत परंतु बँका त्यांच्या डेबिट कार्डवर काही शुल्क आकारतात.

एवढेच नाही तर तुम्हाला तुमच्या व्यवहारांबद्दल फोनवर जो काही एसएमएस येतो तो पाठवण्याची शुल्क देखील बँक आकारत असते व ते 30 रुपये प्रति तीन महिन्यासाठी असू शकते. त्यामुळे तुम्ही खाते वापरत नसेल तरी देखील तुम्हाला हे शुल्क भरावेच लागते.

3- मिनिमम बॅलन्स नसल्याने भरावा लागणारा दंड- जर तुम्ही खाते वापरत नसाल तरी देखील तुम्हाला त्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे असते. तुम्ही बचत खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवली नाही तर बँकेचे जे काही नियम आहे त्यानुसार तुम्हाला निश्चित दंड भरणे गरजेचे असते.

त्यामुळे तुम्हाला हा दंड टाळायचा असेल तर तुमचे जेवढे बँकेत खाते आहेत तेवढ्या मध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे असते. त्यामध्ये जर तुम्ही दंडाची रक्कम भरली नाही तर ती वाढत जाते आणि नंतर तुमच्यावर बोजा वाढतो.

4- आयटीआर फाईल करताना येऊ शकते अडचण- जर तुमचे एका पेक्षा जास्त बचत खाती असतील तर त्याची समस्या तुम्हाला आयकर रिटर्न भरताना येऊ शकते. जेव्हा तुम्ही आयकर विवरण पत्र भरतात तेव्हा प्रत्येक बँक खात्याचा तपशील तुम्हाला देणे गरजेचे असते.

अशा परिस्थितीमध्ये जर एकापेक्षा जास्त बँकेत बचत खाते असतील तर अशा अकाउंटच्या कागदपत्रांचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही एखाद्या खात्याचा तपशील देण्यामध्ये चूक केली तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस देखील येऊ शकते.

5- खाते बंद होऊ शकते- समजा तुम्ही बारा महिन्यापर्यंत संबंधित बँकेच्या खात्यातून कुठल्याही प्रकारचा व्यवहारच केला नाही तर ते खाते निष्क्रिय खाते म्हणून घोषित केले जाईल व पुढील बारा महिने निष्क्रिय खात्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा व्यवहार केला गेला नाही

तर ते बँक खाते फ्रीज करून निष्क्रिय खात्याच्या श्रेणीत ठेवले जाते. अशा इन ऍक्टिव्ह अकाउंट म्हणजेच निष्क्रिय खात्यामधून व्यवहार केला जाऊ शकतो परंतु नेट बँकिंग तसेच एटीएम व्यवहार किंवा फोन बँकिंग तुम्ही करू शकत नाहीत.

Ajay Patil