Fraud Loan Alert : कर्ज घेत असाल तर टाळा ‘या’ चुका, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका

Fraud Loan Alert : कधीकधी अनेकांना मोठ्या रकमेची गरज पडते. प्रत्येकाकडे ही रक्कम असतेच असे नाही. त्यामुळे ते कर्ज घेतात. जर तुम्हीही कर्ज घेत असाल तर सावध व्हा.

कारण कर्ज घेताना तुमचीही फसवणूक होऊ शकते. सध्या फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत आहेत. फसवणूक करणाऱ्यांनी अनेकांची बँक खाती रिकामी केली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या गोष्टींची घ्या काळजी

क्रमांक 1

जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेत असाल तर तुम्हाला फसवणूक होऊ शकते. बनावट बँक अधिकारी बनून केवायसीच्या नावाखाली तुम्हाला कॉल येईल. त्यामुळे तुमची गोपनीय बँकिंग माहिती घेऊन ते तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.

क्रमांक 2

तुम्ही कोणतेही अॅप किंवा कोणत्याही व्यक्तीकडून कर्ज घेण्याच्या भानगडीत पडू नका. कारण कर्जासाठी तुम्ही थेट बँकेशी संपर्क साधू शकता. हे अॅप्स किंवा लोक कर्ज देण्याऐवजी पैसे घेतात आणि नंतर तुम्हाला ते पैसेही परत करत नाहीत.

क्रमांक 3

तुम्हाला अशा अनोळखी मेसेजेस, ईमेल किंवा व्हॉट्सअॅप मेसेजबद्दल सतर्क राहावे लागेल, कारण यामध्ये प्रक्रिया शुल्काशिवाय कर्ज किंवा कोणत्याही ईएमआयसारख्या ऑफर देतात. त्यामुळे फसवणूक करणारे लोक असे मेसेज पाठवून त्यांची गोपनीय माहिती काढून घेतात आणि नंतर त्यांचे बँक खाते रिकामे करतात.

क्रमांक 4

सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कोणतीही बँक कर्ज देत नसेल, तर तुम्हाला या फसवणूक करणाऱ्यांपासून दूर सावध लागेल. फसवणूक करणारे आमिष दाखवून बँकेकडून कर्ज न मिळणाऱ्या लोकांची फसवणूक करतात,