अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- राहुरी तालुक्यातील गडदे आखाडा येथे विहिरीचे पाणी घेण्याच्या कारणावरून दोघाजणांनी एकाला लोखंडी गज व लाकडी काठीने मारहाण केली आहे. या हल्ल्यात नवनाथ थोरात हा तरुण जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नवनाथ साहेबराव थोरात (रा. गडदे आखाडा, राहुरी) हा तरूण सायंकाळी आठ वाजे दरम्यान त्याच्या घरासमोर उभा होता. त्यावेळी तेथे आरोपी आले.
तेव्हा नवनाथ थोरात त्यांना म्हणाला, सामाईक विहिरीचे पाणी तुम्ही भरता, मला भरु द्या. माझे शेतातील ऊस पाणी मिळाले नाही, म्हणून वाळून चालला आहे.
याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी नवनाथ थोरात यास शिवीगाळ करुन लोखंडी गज व लाकडी काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
सामाईक विहिरीचे पाणी मागितले तर तुला जीवे मारुन टाकीन. अशी धमकी दिली. थोरात या तरूणाने राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली असून आरोपी लहानू सखाराम थोरात व मच्छिंद्र लहानू थोरात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.