कामगारांचे पगार देता येत नसतील तर राजीनामे द्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-स्वछता विभागातील कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे पगार थकविल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना नगरपंचायत कार्यालयात जाऊन शिर्डी महाविकास आघाडीच्या वतीने विचारणा करण्यात आली.

कामगारांचे थकीत पगार देता येत नसतील तर सत्ताधाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.याप्रसंगी शिवसेना नेते कमलाकर कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश गोंदकर, काँग्रेसचे सचिन चौगुले, शिवसेना संजय शिंदे, विजय जगताप,

सचिन कोते, उमेश शेजवळ, सुनील गोंदकर, दत्तूबाबा त्रिभुवन, अमृत गायके, अमोल गायके, सुरेश आरणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. सत्ताधारी गटाकडून भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर अध्यक्ष सचिन शिंदे, सुजित गोंदकर, पप्पू गायके उपस्थित होते.

याप्रसंगी सत्ताधारी गटात आणि महाविकास आघाडी पदाधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. याप्रसंगी बोलताना शिवसेना नेते कमलाकर कोते म्हणाले, की स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांचे चार महिन्यांचे पगार करण्यात यावे, तसेच त्यांना घरी एक महिन्याचा किराणा नगरपंचायततर्फे देण्यात यावा,

या कठीण परिस्थितीत अंत्यविधीच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोविड विमा उतरावा आणि त्यांचा पगार दुपटीने करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

त्यावर नगराध्यक्ष गोंदकर यांनी एक महिन्याचा पगार देऊ आणि उर्वरित दोन महिन्याचा पगार बी.व्ही.जी. कंपनीकडून घेऊन देणार असल्याचे सांगितले. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर म्हणाले, की सरकार महाविकास आघाडीचे आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून निधी खर्च करण्यास मान्यता आणा, मग आम्ही कर्मचाऱ्यांचे पगार करू, यावर बोलताना कमलाकर कोते म्हणाले, की शिर्डी ग्रामस्थांचा कोणताही प्रश्न नागरपंचायतमध्ये घेऊन गेलो असता, सरकार तुमचे आहे तुम्ही मुख्यमंर्त्यांकडून परवानगी आणा, असे सांगितले जाते.

मग शिर्डी नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांनी राजीनामा देऊन टाकावा व प्रशासक नेमावा. मग आम्ही बघतो कसे प्रश्न सुटत नाही. जर तुम्ही राजीनामे दिले तर आम्ही एका दिवसात कामगारांचे पगार करू. नगरपंचयातचे नियोजन ढिसाळ आणि नगरपंचायत नि्क्रिरय असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24