अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात महिला हिंसाचाराच्या घटना सुरूच असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच अशीच एक घटना राहुरी तालुक्यात घडली आहे.
पतीने आपल्या पत्नीकडे दुबईला जाण्यासाठी पत्नीकडे ५० हजार रुपये माहेरहून घेऊन ये म्हणत तिचा छळ केला. . दरम्यान याप्रकरणी जयश्री संदीप रन्नवरे (वय २५) वर्षे, रा. कराळेवाडी, राहुरी फॅक्टरी) या विवाहित तरूणीने राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीवरून पोलिसांनी सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, फेब्रुवारी २०१५ पासून ते सप्टेंबर २०१८ रोजी दरम्यान जयश्री रन्नवरे ही तिच्या सासरी नांदत असताना यातील आरोपी हे तिला नेहमी म्हणत, तू आम्हाला आवडत नाही.
तू आई वडील यांच्याकडून जागा घेण्यासाठी तसेच दुबईला जाण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये. या कारणावरुन आरोपींनी जयश्री रन्नवरे हिला नेहमी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच उपाशीपोटी ठेवून घराबाहेर हाकलून दिले.
तिचा शारिरीक व मानसिक छळ करुन तू जर पैसे घेऊन आली नाही तर तुला जिवंत सोडणार नाही. असा दम दिला आहे. या सर्व प्रकरणाला कंटाळून जयश्री रन्नव हिने राहुरी पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.