माझ्याशी बोलली नाही तर तुझ्यावर अ‍ॅसिड फेकून मारून टाकेन…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- दोन मने एका ठिकाणी जुळले कि प्रेमाचे नाते फुलू लागते, मात्र आजकाल या प्रेमाची व्याख्या दिवसेंदिवस बदलू लागली आहे.

आजकालच्या पिढीत प्रेम मिळ्वण्यासाठी समोरील व्यक्तीला मजबूर करणे, धमकावणे आदी प्रकार घडू लागले आहे. असाच काहीसा प्रकार औरंगाबाद मध्ये घडला आहे.

अल्पवयीन मुलीला फोनवर माझ्याशी बोलली नाही, चॅटींग केली नाही किंवा तुझे फोटो पाठविले नाही तर अ‍ॅसिड फेकून तुझे तोंड जाळीन अशी धमकी देणाऱ्या माथेफिरु रोमियोला मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी दि.७ रात्री बेड्या ठोकल्या.

सचिन बाबासाहेब लिपणे (२० रा. प्रकाशनगर, मुकुंदवाडी) असे माथेफिरु रोमीयोचे नाव असून त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. खडसे यांनी सोमवारी दिले.

प्रकरणात १७ वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार, २ मार्च रोजी दुपारी पीडितेने फिर्यादीला सांगितले की, वाढदिवसाच्या दिवशी ओळखीचा मुलगा सचिन लिपाणे याने पीडितेसह तिच्या मैत्रणींना पाणीपुरी खाण्यासाठी नेले होता.

त्यावेळी त्याने पीडितेसोबत फोटो काढले होते. ते फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी त्यांनी सदर पीडीतेला दिली. तू माझ्याशी फोनवर बोल तसेच चॅटींग कर नाहीतर हे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली.

त्यामुळे पीडीतेला त्याचाशी बोलावे लागत होते. मात्र नंतर पीडितेने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यावेळी आरोपीने तिला तु माझ्याशी फोनवर बोलली नाही,

चॅटींग केली नाही आणि फोटो पाठवले नाही तर अ‍ॅसिड फेकुन तुझे तोंड जाळून टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता सहाय्यक लोकाभियोक्‍ता राजू पहाडीया यांनी गुन्हा संवेदनशील असून

आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाइल जप्‍त करणे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24