ताज्या बातम्या

Car Tips : तुम्हीही कारमध्ये विसरत असाल ‘या’ वस्तू, तर होऊ शकते तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान

Published by
Ahmednagarlive24 Office

Car Tips : अनेकजण कार व्यवस्थित वापरत नाहीत. त्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकांना तर काही वस्तू कारमध्ये ठेवण्याची किंवा विसरण्याची सवय असते. परंतु, त्यांच्या याच सवयीमुळे त्यांना खूप मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो.

जीवनावश्यक असणाऱ्या वस्तू जर कारमध्ये विसरला तर त्याचे तसे तोटेही आहेत. जर तुम्हालाही कारमध्ये जीवनावश्यक वस्तू विसरण्याची सवय असेल तर आजच सावध व्हा. कारण तुमची हीच सवय तुम्हाला एक दिवस मोठ्या अडचणीत आणू शकते.

पर्स, महत्वाची कागदपत्रे आणि महागड्या वस्तू गाडीमध्ये ठेवू नका

अनेकजण आपली पर्स गाडीतच ठेवतात. जर तुम्हीही स्वतःची आणि गाडीशी निगडित महत्त्वाची कागदपत्रेही गाडीतच ठेवत असाल तर लगेच ही सवय बदला. कारण ही खूप चुकीची सवय आहे. समजा जर तुम्ही ही वस्तू तुमच्या कारमध्ये ठेवली.

कोणीतरी तुमची कार चोरली किंवा कोणीतरी तुमच्या कारची काच फोडून ही वस्तू चोरली, तर ते तुमच्यासाठी खूप त्रासदायक असेल. इतकेच नाही तर महागड्या वस्तूंच्या बाबतीतही तेच आहे. त्यामुळे चुकूनही तुम्ही तुमच्या कारमध्ये महागड्या वस्तू ठेवू नका.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेवणे टाळा

उन्हाळ्यात कारमध्ये इलेक्ट्रॉनिक्स ठेवणे टाळा. उदाहरणार्थ, जर समजा तुम्ही तुमचा फोन किंवा लॅपटॉप कारमध्ये ठेवला आणि तुमची कार उन्हात उभी आहे. तर कारमधील वाढलेल्या तापमानामुळे तुमच्या इलेक्ट्रॉनिक्सचे नुकसान होऊ शकते. इलेक्ट्रॉनिक्समध्ये तापमान सहन करण्याची क्षमता असली तरी जास्त इलेक्ट्रॉनिक्स तुमच्या कारमध्ये असेल तर ते खराब होईल. यामुळे आगीची घटनाही होऊ शकते.

पाणी

समजा जर तुम्ही तुमची पाण्याची बाटली गाडीत टाकून निघून गेला आता जेव्हा तुम्ही काही वेळाने परत याल तेव्हा तुम्हाला असे दिसेल की उन्हाळ्यात बंद गाडीच्या आत पाणी गरम होते. जर तुम्ही हे पाणी प्याल तेव्हा ते पिण्यायोग्य नसेल.

Ahmednagarlive24 Office