अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :-सध्या रिलायन्स जिओ , एअरटेल , व्होडाफोन आयडिया या कंपन्या सातत्याने काही ना काही नवे प्लॅन्स आणण्याच्या प्रयत्नात असतात.
अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करणे आणि ग्राहकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या अशा प्रकारचे घाट घालत असतात. दरम्यान, जर तुमच्याजवळ एअरटेलचं सिम असेल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच आहे.
कंपनी तुम्हाला रिचार्ज योजनेवर 4 लाख रुपयांचा थेट लाभ देत आहे. 279 रुपयांच्या रिचार्ज प्लानवर हा लाभ उपलब्ध असून तो तुम्हाला घेता येईल.
जीवन विमा किंवा आरोग्य विम्याचा लाभ घेण्यासाठी प्रीमियम भरावा लागतो, परंतु काही कंपन्या किंवा सरकारी योजना तुम्हाला जीवन किंवा आरोग्य विमा मोफत देतात.
एअरटेल त्याच्या दोन प्रीपेड रिचार्जसह विनामूल्य मुदत जीवन विमा देते. हा प्लॅन 279 आणि 179 रुपयांच्या रिचार्जवर उपलब्ध आहे. 279 रुपयांच्या प्लॅनवर इतर लाभासह 4 लाख रुपयांचा टर्म लाईफ इन्शुरन्स उपलब्ध असून
त्याचबरोबर 179 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर 2 लाखांचा जीवन विमा आहे. जन धन योजनेअंतर्गत खुल्या बँक खात्यासह RuPay डेबिट कार्डवर 30,000 रुपयांचे जीवन विमा संरक्षण आणि 2 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण आहे.