file photo

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  जर तुम्ही नगर शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे पालिकेची थकबाकी असेल तर त्या मालमत्ताधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण असा थकबाकीदार नागरिकांसाठी मनपाने खास सवलत जाहीर केली आहे.

ती म्हणजे अहमदनगर महानगरपालिका व जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने सन २०२० व २०२१ अखेर थकबाकीची व शास्तीपोटी ज्याची रक्कम वीस हजार पेक्षा जास्त थकीत आहे.

अशा मालमत्ताधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तरी मालमत्ता कराच्या थकबाकीवर आकारण्यात आलेल्या शास्ती रकमेवर तडजोड करण्यासाठी दि.२५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले आहे.

तरी जिल्हा न्यायालय अहमदनगर येथे थकित मालमत्ताधारकांनी उपस्थित राहून ७५ टक्के शास्ती माफीचा फायदा घेऊन महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी केले.