अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोपरगाव तालुक्यातील कोरोना संबंधित आकडेवारी चिंताजनक असून कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी व्हायला तयार नाही.
खासगी दवाखान्यात उपचार घेऊन काही रूग्ण होम क्वारंटाईन होण्यावर भर देतात; मात्र तसे केल्याने कुटुंबासह आजूबाजूच्या नागरिकांनाही संक्रमित करण्याचा धोका निर्माण होतो.
हे सर्व टाळण्यासाठी कोपरगाव तालुका प्रशासनाच्या निगरानीखाली असलेल्या कोणत्याही कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे.
पोहेगाव कोविड सेंटरमध्ये अनेक रुग्णांनी उपचार घेऊन करून कोरोनावर मात केली. त्यामुळे रुग्णांनी न घाबरता येथील सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन शिवसेना नेते नितीन औताडे यांनी केले आहे.
पत्रकात औताडे यांनी म्हटले, की पोहेगाव ग्रामपंचायत, पोहेगाव नागरी पतसंस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यमाने पोहेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.
लोकसहभागातून सुरू झालेल्या या कोविड सेंटरसाठी परिसरातील व्यापारी, वकील, डॉक्टर्स, शिक्षक, सामाजिक संस्था, क्रीडा मंडळे, विविध गावातील संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी वस्तुरूप व आर्थिक मदतीचे धनादेश देत परिसरातील रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
कुटुंबातील व्यक्तीला ताप, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी व इतर काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी.
∀ न घाबरता कोविड सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार घेतला तर हा आजार निश्चित बरा होतो. तेव्हा पोहेगाव परिसरातील कोरोनाच्या रुग्णांनी कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन औताडे यांनी केले आहे.