Bad Habits : सध्या धावपळीचे युग आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. धावपळीच्या युगामुळे अनेकांना वाईट सवयी लागतात. या वाईट सवयीमुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देत असतो. सुरुवातीला या आजारामुळे फारसा फरक जाणवत नाही.
परंतु, नंतर त्याचे गंभीर परिणाम जाणवतात. अनेकांना धावपळीच्या युगात तरुण दिसायचे असते. परंतु, त्यांच्या वाईट सवयीमुळे तर वेळेपूर्वी म्हातारे दिसतात, जर तुम्हालाही या सवयी असतील तर त्या आजच सोडा नाहीतर तुम्हीही वेळेपूर्वी म्हातारे दिसू शकता.
अपुऱ्या झोपेमुळे त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. कमी वेळ झोपल्यामुळे शरीर स्वतःला दुरुस्त करत नाही आणि यामुळे त्वचा अधिक निस्तेज दिसू लागत असल्याचे आरोग्य तज्ञ सांगतात.
धूम्रपान केल्याने विषारी पदार्थ शरीरात प्रवेश करतात, त्यामुळे श्वसन प्रणालीमध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच तंबाखूजन्य पदार्थ सेवन केले तर त्वचेच्या नवीन पेशींची निर्मिती कमी होते.
अनेकजण पौष्टिक आहार घेत नाहीत त्यामुळे ते सुद्धा लवकर वृद्ध दिसतात. जर तुम्हाला तरुण दिसायचे असेल तर रोज पौष्टिक पदार्थ खा.
अनेकजण सकाळी उशिरापर्यंत झोपतात, उशिरापर्यंत झोपल्याने त्यांना मॉर्निंग वॉकला जाता येत नाही. त्यामुळे ते म्हातारे दिसू लागतात.
जास्त दारू पिण्याच्या सवयीमुळे डोळ्यांखाली सूज येऊन त्यांच्या त्वचेवर सुरकुत्या पडत असल्याचे अनेक अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळे व्यक्ती लवकर वृद्ध दिसते.
अनेक जणांना कमी पाणी पिण्याची सवय असते. ही सवय वेळीच बदलायला पाहिजे. नाहीतर त्वचेची चमक नाहीशी होते.
अनेक जणांना गोड पदार्थ खाण्याची सवय असते. परंतु, गोड पदार्थ आरोग्याला हानी पोहोचवते, तसेच त्वचाही सैल व्हायला सुरुवात होते. त्यामुळे गोड पदार्थ कमी प्रमाणात खा.