अंगणात तुम्ही ‘ह्या’ फुलांचे झाड लावल्यास सुगंधासह मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- हिंदू धर्मात वनस्पतींना मोठा आदर दिला जातो. त्यापैकी काहींची पूजाही केली जाते. असे म्हटले जाते की विशिष्ट प्रकारच्या वनस्पती फायदेशीर असतात.

आतापर्यंत आपण सर्वजण तुळशी आणि पिंपळ ह्या वनस्पतींचे चमत्कारीक फायदे वाचत आहात. आज आम्ही तुम्हाला रातराणी वनस्पतीची वैशिष्ट्ये सांगणार आहोत.

रातराणी ज्याला चांदणी देखील म्हणतात. रातराणीच्या फुलांचा गंध सर्वत्र दरवळत असतो. ह्याचे लहान लहान फुले गुच्छ मध्ये असतात.

फुले रात्रीच्या वेळी उमलतात आणि सकाळी मावळतात. यामुळे ह्याला रातराणी म्हणतात. या वनस्पतीचे अंगणात असणेही फायद्याचे असते. जाणून घेवूयात याचे फायदे.

1 रातराणीचे किंवा चांदणीचे फूल वर्षभरातून 5 किंवा 6 वेळा येतात. प्रत्येकी वेळी 7 ते 10 दिवसात आपला गंध सर्वत्र दरवळतात. याने वास्तुदोष दूर होतो.

2 रातराणी किंवा चांदणीचा गंध घेतल्याने जीवनातील सर्व वेदना नाहीश्या होतात, मानसिक ताण कमी होतो. स्नायू रोगात रातराणीचा आणि त्याचे फूल फायदेशीर असतं. रातराणीच्या सुगंधाने सर्व प्रकाराची काळजी, भीती दूर होते.

3 रातराणीच्या फुलांचे गजरे तयार केले जातात. जे केसात माळले जाते. हे माळून बायका नेहमी आनंदी राहतात.

4 रातराणीच्या फुलांनी अत्तर देखील बनवले जाते. मानसिक ताण दूर करण्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आपल्या शयनगृहात आणि आंघोळ करताना रातराणीच्या अत्तराचा वापर केले पाहिजे. रातराणीच्या अत्तराने स्नान केल्याने किंवा सुगंध घेल्याने डोके दुखीचा त्रास कमी होतो.

5 रातराणीच्या सुगंधांचा मनावर आणि मेंदूवर सखोल प्रभाव पडतो. ज्यामुळे आपल्या विचारांवर त्याचा फरक पडतो. आपली सकारात्मक विचारसारणी होऊ लागते.

अहमदनगर लाईव्ह 24