iPhone 5G : भारतातील काही शहरांमध्ये 5G सेवा सुरु झाली आहे तर अनेक शहरांमध्ये ती येणार आहे. अशातच Apple ने आपले 5G अपडेट सादर केले आहे.
तुमच्याकडे 5G ला सपोर्ट करणारे iPhone मॉडेल असेल, तर तुम्हाला 5G चा लाभ घेऊ शकता. 5G साठी तुम्ही Airtel किंवा Jio वापरू शकता. जर तुम्हाला अजूनही 5G सेवा मिळाली नसेल तर काय करायचे ते जाणून घेऊया.
Apple नुकतेच iOS 16.2 रिलीझ केल्यामुळे भारतातील आयफोन वापरकर्त्यांना राहत असलेल्या भागात 5G नेटवर्कचा लाभ घेता येईल. यामध्ये 2020 किंवा नंतर लाँच झालेल्या सर्व iPhones चा समावेश आहे. जर तुमच्याकडे iPhone 12 किंवा नंतरचे मॉडेल असेल तर तुम्ही 5G सेवेचा लाभ घेऊ शकता.
या iPhones वापरकर्त्यांना घेता येईल Jio True 5G चा लाभ
iPhones च्या या उपकरणांमध्ये iPhone SE (2022), iPhone 12 mini, iPhone 12 Pro, iPhone 12, iPhone 12 Pro Max, iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 13 Pro Max, iPhone 13 Pro, iPhone 14 Pro Plus, iPhone 14 Pro, iPhone 14 Plus चा iPhone 14 मध्ये समावेश आहे.या वापरकर्त्यांना Jio True 5G चा लाभ घेता येईल.
असे करा ॲक्टिवेट
जर तुम्ही Jio किंवा Airtel चे सिम वापरत असाल आणि तुमच्या शहरात किंवा गावात 5G सुरू झाले असेल, तरच तुम्हाला 5G वापरता येईल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या iPhone च्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. नंतर जनरल सेटिंग्जवर जाऊन Software Update वर टॅप करा आणि जर तुमच्या iPhone साठी iOS 16.2 अपडेट रिलीज झाला असेल तर तुम्हाला डाउनलोड असा पर्याय दिसेल.
सर्व नियम आणि अटी वाचल्यानंतर, तुमच्या iPhone वर अपडेट डाउनलोड करा. त्यामुळे तुम्हाला एक नवीन 5G स्टेटस आयकॉन मिळेल. अजूनही 5G स्टेटस दाखवत नसेल तर तुम्हाला फोनच्या सेटिंग्जमधील सिम सेटिंगमध्ये जाऊन 5G नेटवर्क ॲक्टिवेट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला iPhone वर 5G इंटरनेट वापरता येईल.