PMGKAY : केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते. यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना होय.
या योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी गरीब कुटुंबांना अन्न पुरवले जात आहे. जर तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे रेशनकार्ड असणे गरजचे आहे.

सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून रोज नवनवीन तपशील समोर येत आहेत. लोकसभेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माहिती दिली आहे की, 2020-21 या आर्थिक वर्षात PMGKAY साठी 1,13,185 कोटी रुपये, तर 2021-22 मध्ये 1,47,212 कोटी रुपये त्याचबरोबर आर्थिक वर्ष 2022-23 साठी 1,30,600 कोटी जारी करण्यात आले आहेत.
ही योजना कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकारने गरीब कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक मदतीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती.
या योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना अन्नधान्य दिले जात आहे. तर या योजनेअंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 3.91 लाख कोटी रुपयांचे अनुदान दिले असून 1,118 लाख टन रेशनचे वितरण केले आहे. ही योजना NFSA अंतर्गत दिलेल्या रेशनच्या वर अतिरिक्त रेशन देते. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो.
असा घ्या लाभ
या योजनेअंतर्गत फक्त रेशनकार्ड असलेल्या आणि ज्यांचे रेशन कार्ड आधारशी जोडलेले आहे अशा लोकांनाच लाभ घेता येतो. महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत देशातील तब्बल 80 कोटी गरीब कुटुंबांना प्रति युनिट 5 किलो तांदूळ आणि गहू दिला जात आहे. अशातच जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही लगेच ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता.