यशस्वी व्हायचं असेल, तर ‘या’ दोन्हीही गोष्टी हव्यात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- गुरुकिल्ली म्हणून ज्या ज्या गोष्टी लोकांनी आपल्याला सांगितलेल्या असतात; त्या प्रत्येकासाठी वेळ द्यावा लागतो. यश मिळेपर्यंत किंवा चुकांची दुरुस्ती होईपर्यंत थांबून राहावं लागतं.

प्रयोग करणे किंवा सुधारणा करणे, ही प्रक्रिया एका यत्रीत घडत नसते. नवीन काहीतरी सुचणे आणि त्याप्रमाणे आपण काही बदल करणे; या गोष्टीदेखील हळूहळू होत राहतात.

त्यात सातत्य राखले तर त्या नक्कीच यश मिळवून देवात. आपल्याला खरंच काही ध्यास असेल किंवा आपण ध्येयवेडे असू, तर आपल्याला वेळ आणि संयम यांचा अंगभूत गुणांप्रमाणे अंगीकार करावा लागतो.

ते सोपे नाही. त्यासाठी वेगळे प्रयत्न आवश्यक असतात. लोकांना अनेकदा यशस्वी होण्याची गुरुकिल्ली हवी असते. त्यासाठी ते लोकांकडून सक्सेस टिप्स वगैरे मागत असतात.

त्यात काहीच गैर नाही. आपल्यापेक्षा अनुभवी लोकांकडून अशा काही गोष्टी शिकायलाच हव्यात. ही गुरुकिल्ली समजून घेताना लक्षात येतं की,

– आपल्या आधी यशस्वी झालेले लोक हे आपल्याला प्रयोग करायला सांगत असतात.

– लोकांच्या अपेक्षेहून जास्त असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे, असं सांगतात.

– लोकांनी दखल घ्यावी, असं काहीतरी पण इतरांपेक्षा वेगळं असं काही केलं पाहिजे.

– सतत नवीन काहीतरी करत राहा आणि त्यात गरजेनुसार सुधारणा करत राहा.

अहमदनगर लाईव्ह 24