Investment Tips : वयाच्या 30 व्या वर्षीच व्हायचे असेल करोडपती तर अशाप्रकारे करा गुंतवणूक

Investment Tips : अनेकांचे आपल्याकडे भरपूर पैसे असावे असे स्वप्न असते. परंतु, कोणालाही एकाच दिवसात करोडपती होता येत नाही. त्यासाठी सर्व तयारी करून गुंतवणूक करावी लागते.

जर तुम्हाला वयाच्या 30 व्या वर्षीच व्हायचे असेल करोडपती तर काही योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. या योजना कोणत्या आहेत आणि कशाप्रकारे पैसे गुंतवावे ते सविस्तर जाणून घेऊयात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

1. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक

व्यावसायिक मालमत्तेतूनही सर्वात जास्त परतावा मिळतो. देविका ग्रुपचे एमडी अंकित अग्रवाल यांच्या मते, जर तुम्हाला वयाच्या 30 व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे.यामध्ये कार्यालये, दुकाने, गोदामे आणि इतर अनेक रिअल इस्टेट मालमत्तांचा समावेश असतो.

अग्रवाल यांच्या मते, ग्रेड-ए ऑफिस स्पेस तुम्हाला सहज 6-7% सरासरी उत्पन्न देऊ शकते. त्यामुळे तुम्ही रिटेल युनिट्समध्ये 8-9% उत्पन्न मिळवू शकता आणि तो सर्वात सुरक्षित पर्याय देखील आहेत. मालामाल व्हायचे असेल तर तुमच्या गुंतवणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात व्यावसायिक मालमत्ता हा एक चांगला पर्याय असू शकतो.

2. SIP मध्ये गुंतवणूक

जर तुम्हाला कमी कालावधीत दुप्पट-तिप्पट गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी SIP हा सर्वोत्तम पर्याय आहे. एसएजी इन्फोटेकचे एमडी अमित गुप्ता यांच्या मते, गुंतवणूकदारांनी लवकरात लवकर SIP मध्ये गुंतवणूक करावी.जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक करावी. कारण या वयात आर्थिक उद्दिष्टे जलद साध्य करण्यात अनेकजण यशस्वी होतात.

3. PPF मध्ये गुंतवणूक

गुंतवणुकीसाठी पीपीएफ हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वात कमी जोखीम असून निश्चित व्याज मिळते. आणखी एक म्हणजे तुम्हाला कर लाभही मिळतो. म्हणजेच तुमची पीपीएफमधील गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारे व्याज हे सर्व सुरक्षित असते.

त्यामुळे जर तुम्हालाही वयाच्या 30 व्या वर्षीच व्हायचे असेल करोडपती तर या योजनांमध्ये गुंतवणूक करा. त्याचबरोबर यामध्ये निश्चित परतावा आणि कोणतीही जोखीम तुम्हाला घ्यावी लागत नाही.