Investment Tips for 2023 : अनेकांना कमी कालावधीत जास्त पैसे कमावण्याचा नाद असतो. त्यासाठी तशी रणनीती आखावी लागते. परंतु, अगोदरच पैशांची कमतरता त्यात एखाद्या योजनेत पैसे गुंतवले तर खिशात कमी पैसे शिल्लक राहतात.
त्यामुळे ते गुंतवणूक करत नाहीत. परंतु, बाजारात अशाही काही योजना आहेत ज्या जास्त परतावा देत आहेत. अनेकांना या योजनेबाद्दल माहीतच नाही. जाणून घेऊयात सविस्तर या योजनेबद्दल..
1. पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव योजना
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत केवळ 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. 18 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिकाला या योजनेत गुंतवणूक करता येते. तसेच गुंतवणुकीचे पैसे दर तिसऱ्या महिन्याला खात्यात जमा होतात. चक्रवाढ व्याजाचा लाभ या योजनेत मिळतो.
2. म्युच्युअल फंड
जर तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून जबरदस्त परतावा मिळवू शकता. दीर्घकालीन कालावधीसाठी या योजनेतील गुंतवणूक चांगला पर्याय आहे.
तसेच हे लक्षात ठेवा की या योजनेतील गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही.
3. KVP योजना
जर तुम्हाला काही वर्षात गुंतवणूक करून पैसे डबल करायचे असेल तर तुम्ही किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळत आहे.
4. LIC जीवन आनंद पॉलिसी
तुम्हाला LIC च्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणुकीवर बोनसचा लाभ मिळतो. तसेच या पॉलिसीच्या पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याला 125% मृत्यू लाभ दिला जातो. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगली आहे. या पॉलिसीची किमान विमा रक्कम रु 1 लाख रुपये इतकी असून तिची कोणतीही कमाल मर्यादा निश्चित नाही.