Business Idea : बक्कळ पैसा कमवायचा असेल तर घरबसल्या सुरु करा ‘हा’ व्यवसाय, बाजारातही आहे मोठी मागणी

Business Idea : अनेकजण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळू लागेल आहेत. यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. दिग्ग्ज कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत असल्याने हे तरुण स्वतःचा व्यवसाय सुरु करत आहे.

महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारही या व्यवसायात मदत करत आहे. तुम्ही सरकारची मदत घेऊन सोलर पॅनेलचा व्यवसाय सुरु करता. तुम्ही हा व्यवसाय अगदी घरबसल्या सुरु करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

केंद्र सरकार सोलर पॅनल बसवण्यासाठी 30 टक्के सबसिडी देत आहे . त्यासाठी एकूण 1 लाख रुपये खर्च येतो. केंद्र आणि राज्य सरकारचे संपूर्ण लक्ष सौरऊर्जेवर असून मदतीने तुम्ही घरबसल्या बंपर कमाई करू शकता.

इतकी कमाई होईल

जर तुमच्याकडे पैसे नसले तरी अनेक बँका त्यासाठी पैसे देतात. तुम्ही तेहेल बँक ऑफ सोलर सबसिडी स्कीम, कुसुम योजना, नॅशनल सोलर एनर्जी मिशन कडून एसएमई कर्ज घेऊ शकता. या व्यवसायातून तुम्ही एका महिन्यात 30,000 ते 1 लाख रुपये सहज मिळवू शकता.

खर्च

काही राज्यांनी औद्योगिक क्षेत्रात सौरऊर्जा प्रकल्प बंधनकारक केले आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे सौर उत्पादने विकण्याचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये तुम्हाला सोलर पीव्ही, सोलर थर्मल सिस्टीम, सोलर अॅटिक फॅन तसेच सोलर कूलिंग सिस्टीमचा व्यवसाय सुरू करता येईल.

सौरऊर्जेशी निगडित व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांच्या एसएमई शाखेतून कर्ज मिळत आहे. हे लक्षात घ्या की हा खर्च राज्यानुसार बदलतो. शासनाकडून अनुदान मिळाल्यानंतर 60 ते 70 हजार रुपयांमध्ये एक किलोवॅटचा सोलर प्लांट बसतो.

जाणून घ्या फायदे

सौर पॅनेलचे आयुष्य 25 वर्षे असून तो तुम्ही तुमच्या छतावर सहज बसवू शकता. त्यामुळे तुम्हाला वीज मोफत मिळते. तसेच उर्वरित वीजही ग्रीडद्वारे सरकार किंवा कंपनीला विकता येते.

जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर 2 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवले तर 10 युनिट वीज निर्माण होईल. म्हणजे एका महिन्याचा हिशोब केला तर दोन किलोवॅटच्या सोलर पॅनलमधून सुमारे 300 युनिट वीज निर्माण होईल.

देखभाल

देखभालीमध्ये विशेष अडचण येत नाही. कारण त्याची बॅटरी दर 10 वर्षांनी बदलावी लागते. त्याची किंमत सुमारे 20 हजार रुपये इतकी आहे. तसेच तुम्ही सोलर पॅनल एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येतो.