Smart Card Driving License : मिळवायचे असेल स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स तर फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Smart Card Driving License : भारत सरकारने सप्टेंबर 2013 मध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी स्मार्ट कार्ड जारी केले आहे. या अगोदर वाहन चालविण्याचे परवाने राज्याच्या नावाने जारी केले जात होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु आता सरकारच्या नावाने स्मार्ट कार्ड जारी केले जात आहे. अनेक राज्यांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स स्मार्ट कार्डच्या स्वरूपात आहेत. जर तुमच्याकडे अजूनही सामान्य कार्ड असेल तर तुम्ही ते स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरित करण्यासाठी अर्ज करू शकता.

असा करा स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज

Advertisement

फॉलो करा या स्टेप्स

स्टेप 1: सर्वात प्रथम भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या परिवहन सेवेच्या अधिकृत वेबसाइटला (parivahan.gov.in) भेट द्या.

स्टेप 2: ‘ऑनलाइन सेवा’ ड्रॉप-डाउन मेनूवर क्लिक करा आणि ‘ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा’ हा पर्याय निवडा.

Advertisement

स्टेप 3: त्यानंतर तुमचे राज्य निवडा आणि नंतर RTO पर्याय निवडा.

स्टेप 4: त्यानंतर ‘ऑनलाइन अर्ज करा’ ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘नवीन ड्रायव्हिंग लायसन्स’ हा पर्याय निवडा.

स्टेप 5: दिलेल्या सर्व सूचना वाचून वैयक्तिक तपशील भरा (पत्ता आणि माहिती), आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, फोटो आणि स्वाक्षरी (आवश्यक असल्यास).

Advertisement

स्टेप 6: त्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार चाचणीसाठी RTO ला भेट द्या.

स्टेप 7: जर तुम्ही चाचणी उत्तीर्ण झाला तर तुम्हाला स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पोस्टाद्वारे प्राप्त होईल.

पात्रता

Advertisement

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पात्र असाल आणि तुम्ही नवीनसाठी अर्ज करत असाल, तर तुम्हाला कदाचित स्मार्ट कार्ड दिले जाईल, जर त्या व्यक्तीकडे जुने किंवा कागद असेल तर तुम्हाला ते स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करता येते.

जर तुम्हाला परवाना मिळवायचा असेल तर तुमचे वय 18 वर्षे असेल तर तुम्हाला 50 सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमतेसह गियर मोटरसायकल चालविण्याचा स्मार्ट कार्ड परवाना मिळेल. जर तुम्हाला 50 सीसी पर्यंतच्या इंजिन क्षमतेसह गीअरलेस बाइक चालवायची असेल तर तुमचे वय 16 वर्षे गरजेचे असते.

Advertisement