‘जर’ तालुक्यात पक्ष वाढवाचया असेल तर महाआघाडी सोबत जाऊ नका!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे मिळून ‘महाविकास आघाडी’चे सरकार आहे. परंतु आता अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर मतभेद निर्माण झाले आहेत.

नुकताच याचा प्रत्यय शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे यांना आला आहे. नुकतीच पाथर्डीत शिवसेनेच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित केली होती.

यावेळी तालुक्यात शिवसेना पक्ष वाढवायचा असेल तर महाआघाडी सोबत न जाता स्वबळावर शिवसेनेने आगामी निवडणुका लढाव्यात अशी भुमिका तालुक्यातील काही पदाधिका-यांनी मांडली.

त्यावर पक्षवाढीसाठी काम करा तुमची मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडतो ते देतील तो आदेश पाळावा लागेल असे त्यांनी सांगितले. संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे यांनी शिवसेना वाढविण्यासाठी जी काही मदत लागेल ती मी पक्षवाढीसाठी निश्चित करेल असे आश्वासन दिले.

मात्र तालुकाप्रमुख यांनी विरोध दाखवला पक्षाचा आदेश पाळण्यास तयार आहोत परंतु शिवसेना पक्ष वाढवायचा असेल तर शिवसेनेचे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद साठी स्वतंत्र उमेदवार उभी करावी अशी मागणी केली आहे.

Ahmednagarlive24 Office