Men Health : निरोगी आरोग्यासाठी व्यायाम करणे खूप फायद्याचे असते. त्यामुळे स्त्री किंवा पुरुषांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण व्यायामाचे फायदे खूप आहेत.
त्याचप्रमाणे आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. अनेक पुरुष आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे तंदुरुस्त राहायचे असेल तर पुरुषांनी काही पदार्थ खाल्ले पाहिजे.
भाज्या आणि फळांचे करावे सेवन
शरीराला तंदुरुस्त ठेवायचे असेल तर फळांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे पुरुषांना फळे खाण्याचा सल्ला देण्यात येतो. त्याचबरोबर त्यांनी व्हिटॅमिनयुक्त भाज्याही खाव्यात. कारण त्यामध्ये कॅलरीज कमी असून वजनही नियंत्रित राहते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.
सुका मेवा शरीराला बळकट करतो
सुका मेवा हा शरीराला बळकट करतो. पुरुषांनी त्यांच्या आहारात काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि अंजीर खाल्ले पाहिजे, यामध्ये प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात.
दूध आणि दही
दुधामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा, शरीर बळकट होते आणि अशक्तपणा दूर होतो. तर दही खाल्ले तर पचनक्रिया चांगली राहते. त्याचबरोबर चीज देखील खावे.त्यामुळे पुरूषांनी दूध आणि दह्याचे सेवन करावे.
अंडी
अंड्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी, प्रोटीन, आयर्न आणि ल्युटीन हे गुणधर्म आढळतात. त्यामुळे पुरुषांनी रोज एक अंडे जरूर खावे.
मासे
जर तुम्ही मांसाहार करत असाल तर पुरुषांनी मासे खाणे उत्तम आहे, कारण यामध्ये ओमेगा-3 तुमचे हृदय मजबूत ठेवते, त्यामुळे पुरुषांमध्ये हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता नसते. त्यामुळे पुरुषांनी मासे खावेत.