Best Oil for Hair Growth : केसांची गळती थांबवायची असेल तर वापरा ‘हे’ तेल

Best Oil for Hair Growth : अनेकजण केस गळतीने हैराण असतात. अनेक उपाय करूनही काहींचे केस गळतच राहतात. जर तुम्हीही या समस्येने हैराण असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बाजारात अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहे. त्यापैकी तुम्ही हे तेल वापरले तर तुमच्या केसांची गळती थांबते. त्याचबरोबर केस घनदाट आणि घट्ट होतात.

कोणते तेल आहे चांगले

Advertisement

1. खोबरेल तेल

दाट केसांसाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. यामध्ये फॅटी अॅसिड्स भरपूर प्रमाणात असून ते केसांच्या छिद्रांमध्ये प्रवेश करतात आणि त्यांना आतून पोषण देतात.हे तेल जीवनसत्त्वे आणि खनिजांचा खूप चांगला स्रोत आहे. त्याशिवाय या तेलाने केस मऊ, चमकदार आणि घट्ट होतात.

2. बदाम तेल

Advertisement

जर तुम्हाला तुमचे केस घट्ट आणि मजबूत बनवायचे असतील तर बदामाचे तेल खूप फायदेशीर आहे कारण त्यात फॅटी अॅसिड्स आढळतात.यामुळे व्हिटॅमिन ई केसांना मिळते. केस गळती थांबवण्यासाठी हे तेल फायद्याचे आहे.

3. ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमुळे केसांची गळती कमी होते. हे तेल अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ईने परिपूर्ण आहे. तुमचे केस गळत असतील तर तुम्ही तज्ञाचा सल्ला घेऊ शकता.

Advertisement

4. आर्गन तेल

केसांच्या मजबुतीसाठी आर्गन तेल फायद्याचे आहे. कारण हे तेल अर्गन वनस्पतींमधून मिळते. बियांपासून हे तेल तयार करतात. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी ऍसिड असते जे केसांसाठी फायद्याचे असते.

5. जोजोबा तेल

Advertisement

हेल्दी स्कॅल्पसाठी जोजोबा तेल फायदेशीर आहे. हे तेल तुम्ही रोज वापरले तर केस दाट आणि घट्ट होतात. जोजोबा तेल कोरड्या टाळू आणि फ्लॅकी स्केलपासून मुक्त होण्यास खूप मदत करते. या तेलाचा वापर करून बुरशीजन्य संसर्ग, उवा आणि केसांशी संबंधित इतर समस्या नाहीशा होतात.