Solo Travel Countries : तुम्ही कधी एकट्याने प्रवास केला आहे का? कुटुंब आणि मित्रांपेक्षा एकट्याने प्रवास करणे खूप फायद्याचे आहे. कारण एकट्याने प्रवास केला तर खूप अनुभव आपल्याला येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही आपल्या देशात कुठेही गेला तरी तुम्हाला अनेक प्रकारचे पर्यटक पाहायला मिळतात.
परंतु, आपला देश सोडून एकट्याने फिरण्यासारखे खूप देश आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व देश सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगले आहेत. जर तुम्हालाही एकट्याने प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी काही सर्वोत्तम देश आहेत पहा त्यांची सविस्तर यादी.
एखाद्यासोबत प्रवास करण्याचा आनंद घेणे ठीक आहे, परंतु जर तुम्हाला जगाचे सौंदर्य जवळून अनुभवायचे असल्यास एकट्याने प्रवास करणे खूप चांगले आहे. स्वत:ला रिलॅक्स करण्यासाठी, काही वेळ एकटे राहण्यासाठी किंवा अनोळखी व्यक्तींना भेटणे हे सर्व अनुभव एकट्याने प्रवास केला तर मिळतात.
जर तुम्ही याआधी कधीही एकट्याने प्रवास केला नसेल तसेच जर तुम्हाला एकट्याने प्रवास करण्याचा थरार अनुभवायचा असेल, तर एकट्याने प्रवास करण्यासाठी अधिक चांगली ठिकाणे निवडणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
या आहेत सर्वोत्तम सोलो ट्रॅव्हल कंट्रीज
दक्षिण अमेरिका
दक्षिण अमेरिका हा एक देश नसून पश्चिम गोलार्धात असणारा एक खंड आहे. हा जगातील चौथा सर्वात मोठा खंड असून ज्याचा आकार भारतापेक्षा 6 पट मोठा आहे.
पनामा कालवा आहे जो त्याला उत्तर अमेरिका खंडापासून वेगळे करतो परंतु पनामा देश उत्तर अमेरिकेत आहे. हे लक्षात घ्या की दक्षिण अमेरिकेत 13 देश आणि फॉकलंड बेटांचा समूह आहे ज्यांना पर्यटक सतत भेट देतात.
साहसाच्या दृष्टिकोनातून हे ठिकाण अतिशय प्रेक्षणीय आहे कारण येथे अनेक पर्वत आणि नद्या पाहायला मिळतात. तसेच तुम्हाला याठिकाणी प्राचीन स्थळे आणि रेन फॉरेस्टही पाहायला मिळतात. इथल्या प्रत्येक भागात प्रवाशांसाठी काहीतरी पाहण्यासारखे आहे. अर्जेंटिना, ब्राझील आणि चिलीमध्ये शतकानुशतके जुने रस्ते या ठिकाणी आहेत. येथे जंगलाचे ट्रॅक आढळतात जे अतिशय प्रेक्षणीय आहे.
एकट्याने प्रवास करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची सुरक्षितता. कारण दक्षिण अमेरिकन देशांमध्ये अनेकदा हिंसक बातम्या येतात, ज्यामुळे कोणीही घाबरू शकते. परंतु प्रत्यक्षात असे फार क्वचितच घडते त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आरामात फिरू शकता.
जपान
एकट्याने प्रवास करण्यासाठी जपान हे खूप चांगले ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक जादुई आणि पौराणिक स्थळे सापडतील आणि हा देश एकट्याने प्रवास करण्यासाठी खूप सुरक्षित आहे. हा एक असा देश आहे ज्याचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट मानला जातो कारण हा देश सर्व लोकांसाठी सर्वात सुरक्षित आहे.
येथे टोकियो आणि क्योटो ही दोन प्रमुख शहरे असून याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी पोहोचतात. इतकेच नाही तर या देशात अनेक पर्वत आणि बेटांच्या साखळ्या आहेत. समृद्ध इतिहास आणि अद्वितीय संस्कृती तुम्हाला आकर्षित करते.
जपानच्या लोकांबद्दल सांगायचे झाले तर ते स्वभावाने अतिशय दयाळू आणि सभ्य असतात. ते येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांचे खुलेपणाने स्वागत करतात. इथल्या लोकांना इंग्रजी येत नाही, पण तरीही ट्रान्सलेट अॅपच्या माध्यमातून या समस्येवर उपाय निघतो.
मलेशिया
मलेशिया हा बहुसांस्कृतिक देश असून जिथे दोन भाषा बोलण्यात येतात. त्यांपैकी इंग्रजीही सर्रास वापरण्यात येते. येथे लोक इंग्रजी चांगल्या प्रकारे समजतात त्यामुळे तुम्हाला प्रवासादरम्यान संभाषण करण्यास कोणतीही अडचण येत नाही.
मलेशिया हे लहान गाव, समुद्रकिनारे आणि उंच प्रदेशांसाठी ओळखण्यात येते. या ठिकाणी तुम्हाला आकर्षक आणि अनोखी संस्कृती अनुभवायला मिळते. जर तुम्हाला या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायचा असल्यास मलेशिया हे एकट्याने प्रवास करण्यासाठी खूप चांगले ठिकाण आहे. या ठिकाणी दुपारच्या वेळी थोडा जास्त सूर्यप्रकाश असतो.
युनायटेड किंगडम
युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन होय. हे एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी खूप चांगले पर्यटन स्थळ आहे. येथे प्रत्येकजण इंग्रजी बोलतो जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये.
या ठिकाणी दरवर्षी पर्यटकांचा मोठा ओघ येतो. या ठिकाणी ठिकठिकाणी जाण्यासाठी दिशादर्शक चिन्हे वापरली असून त्यामुळे ये-जा करण्यास कोणतीही अडचण येत नाही.
कॅनडा
कॅनडा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असून या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक अभ्यास आणि नोकरीसाठी येत असतात. सोलो ट्रॅव्हलिंगनुसार कुठेही जायचे असल्यास टोरंटो, ओंटारियो, व्हँकुव्हर, मॉन्ट्रियल सारख्या शहरांना भेट देऊ शकता. इथल्या शहरांमध्ये तुम्हाला मोठमोठ्या टेकड्या, किनारे, हिरवेगार पर्जन्यवन आणि अनेक आकर्षक गोष्टी पाहायला मिळतात.
इटली
इटली हा देश एकट्याने प्रवास करण्यासाठी चांगला आहे. तुम्हाला इथे पाहण्यासारखे खूप काही आहे. इतर युरोपीय देशांच्या तुलनेत या ठिकाणी इंग्रजी कमी बोलली जाते, परंतु दरवर्षी सुमारे 14 दशलक्ष आंतरराष्ट्रीय प्रवासी या ठिकाणी येतात.
इटली हा देश संस्कृतीसाठी ओळखला जातो. या ठिकाणी भेट देण्यासाठी एकापेक्षा जास्त ठिकाणे आहेत. तुम्हाला इटालियन फूड चाखायचे असल्यास त्यासाठी तुम्हाला इथे अनेक रेस्टॉरंट्सही मिळतील.
तुम्ही तुमच्या सोलो ट्रॅव्हल डेस्टिनेशननुसार ठिकाण निवडू शकता. तुम्हाला वेगवेगळ्या संस्कृतीचा अनुभव घेता येईल, इतकेच नाही तर तुम्हाला सुंदर नैसर्गिक ठिकाणेही पाहायला मिळतील, ज्यांच्या दर्शनाने तुमचा प्रवास अप्रतिम होईल.