अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- दिवसातून चार तास किंवा त्यापेक्षा जास्त टीव्ही पाहणाऱ्या व्यक्तींमध्ये रक्त गोठण्याची जोखीम ३५ टक्क्यांपर्यंत जास्त असल्याचा दावा ब्रिटिश संशोधकांनी केलेल्या संशोधनात केला आहे.
विशेषत: मध्यम वयाचे म्हणजे ३० ते ४० वयोगटातील जे लोक अडीच तास सलग टीव्ही पाहतात त्यांच्या तुलनेत चार तासांपेक्षा जास्त टीव्ही पाहणाऱ्यांमध्ये हा धोका एक तृतीयांश जास्त असतो.
संशोधकांनी हा धोका टाळण्यासाठी सल्ला दिला आहे. त्यात नमूद केले की, टीव्ही पाहताना अर्ध्या तासाचा ब्रेक घ्या किंवा स्ट्रेच करा आणि या दरम्यान स्नॅक्स किंवा थोडेफार खाण्याची सवय टाळा.
ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनुसार, नेटफ्लिक्सवर सतत डोळे लावून बसणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तज्ज्ञांनी सांगितले की,
दीर्घकाळपर्यंत बसल्यामुळे व्हेनस थ्रोम्बेम्बोलिज्मचा(व्हीटीई) धोका वाढू शकतो. मात्र, अलीकडच्या अभ्यासात दिसले की, शारीरिकदृष्ट्या सक्रिय लोकांमध्ये रक्त गोठण्याचा धोका जास्त असतो.