Credit-Debit Card : सध्या प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यात क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हे फार महत्त्वाचे झाले आहे. कारण याच्या एका क्लिकवर पैसे काढणे खूप सोयीस्कर झाले आहे.
त्यामुळे ते जपून ठेवणे गरजेचे आहे. परंतु, अनेकांचे हे कार्ड हरवले जाते किंवा चोरीला जाते. जर तुमचेही कार्ड हरवले असेल तर लगेच काही कामे करा त्यामुळे तुमच्याच अडचणी कमी होतील.
करा हे काम
नंबर 1
जर तुमचे कोणतेही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड चोरीला गेले तर ते आधी ब्लॉक करा. त्यासाठी कस्टमर केअर किंवा ऑनलाइन बँकिंगची मदत घ्या. तुम्हाला बँकेला कार्ड ब्लॉक करण्याचे कारण सांगावे लागेल.
नंबर 2
कार्ड चोरीला किंवा ब्लॉक झाले असले तरी, त्याबद्दल बँकेला कळवा. जर तुमच्या खात्यातून कोणताही अनधिकृत व्यवहार झाला असेल तर तुमचे नुकसान होणार नाही. तसेच बँक तुम्हाला मदत करेल.
नंबर 3
तुमचे कार्ड चोरीला जाते किंवा तुमची फसवणूक होते. त्यामुळे तुमच्या इतर नेट बँकिंग आणि एटीएम कार्डचे पासवर्ड नेहमी बदला. कारण ते तुमच्यासाठी ते फायद्याचे आहे.
नंबर 4
तुम्हाला नवीन डेबिट-क्रेडिट कार्ड जारी केले जाईल. त्यामुळे तुमचे कोणतेही काम अडणार नाही.