Indian Railway : दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेही आपल्या प्रवाशांसाठी अनेक सुविधा पुरवत असते. तसेच काही नियमही कडक केले आहेत. तरीही रेल्वेमधून सामान हरवल्याच्या तक्रारी येत आहेत.
अनेक प्रवाशांना शोधूनही सामान सापडत नाहीत. जर तुमचेही सामान चोरीला किंवा हरवले तर काळजी करू नका,तुम्हाला तुमचे सामान परत मिळेल. त्यासाठी तुम्हाला फक्त एक तक्रार करावी लागेल.
तक्रार कशी करावी ?
धावत्या रेल्वेमध्ये सामानाची चोरी झाली तर तुम्ही प्रवासी रेल्वे कंडक्टर, कोच अटेंडंट, गार्ड किंवा जीआरपी एस्कॉर्टशी संपर्क साधू शकता. त्यानंतर तुम्हाला एक FIR फॉर्म देण्यात येईल. तो फॉर्म भरून जमा करावा लागेल.
त्यानंतर पोलिस आवश्यक कारवाई करतील.त्यानंतर तुम्ही तुमचा प्रवास करू शकता. तसेच तुम्ही प्रमुख रेल्वे स्थानकांवर उभारण्यात आलेल्या आरपीएफ मदत पोस्टला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता.
हे आहेत नियम
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामानाची संख्या तुम्हाला अगोदरच सांगावी लागेल.नाही तर तुम्ही नुकसान भरपाई पासून वंचित रहाल. 100 रुपये प्रति किलो याप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल.
‘ऑपरेशन अमानत’
‘ऑपरेशन अमानत अंतर्गत’, रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना त्यांच्या हरवलेल्या बॅगा शोधण्यासाठी मोहीम सुरू केली असून तुम्ही तुमच्या संबंधित रेल्वे झोनच्या वेबसाइटवर तपासू शकता – https://wr.indianrailways.gov.in/
तुमच्या विभागातील RPF कर्मचारी वेबसाइटवर हरवलेल्या वस्तूंचे फोटो पोस्ट करत असतात. त्यामुळे तुम्ही तुमचे हरवलेले सामान या वेबसाइटवर जाऊन तपासू शकतात. तसेच हरवलेल्या मालमत्ता कार्यालय केंद्रांना भेट देऊन सामान तपासू शकतात.