अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- ढवळपुरी येथील 137 एकर जमीन तहसील कार्यालय पारनेर येथील कर्मचारी, पारनेर तालुका सैनिक बँक कर्मचारी व जमीन खरेदी करणारे अमित शेटिया बंधूनीं फसवणूक व खोटी कागदपत्रे सादर करून खरेदी केल्याचा जबाब पीडित कुटुंबातील अशोक रामचंद्र गावडे यांनी पारनेर पोलीस स्टेशनला दिला आहे.
पारनेर तालुका सैनिक बँकेतील कर्मचारी व खरेदी विक्री व्यवसायातील एजंट अनिल नामदेव मापारी, संजय बाजीराव कोरडे, शिवाजी तुकाराम व्यवहारे हे बँक माध्यमातून कर्जदाराच्या जमिनी कवडीमोल भावात लिलाव करून त्या जमिनी जवळच्या नातेवाईकांच्या नावे करून व त्या शेटिया बंधूंना विकायच्या नंतर कर्ज खाते बंद करण्यात यायचे त्यातून येणारा मलिदा वाटून घ्यायचा.
सदर जमीनी वरील महसूल अधिकारी यांना हाताशी धरून फेर मंजुर करून घ्यायचे. बँकेतील कर्जदाराच्या जमिनीवर साधा बोजा, गहाणखत, नसतानाही अनेक जमीनी विक्री केलेल्या आहेत. बँकेतील अधिकारी, पदाधिकारी व महसूल अधिकारी यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.
अशा प्रकारे आर्थिक व्यवहार करून बर्याच लोकांवर पिढ्यानपिढ्या कसित असलेल्या कुळांवर अन्याय करून मोठी रक्कम घेऊन महाघोटाळा तहसीलदार व सैनिक बँकेतील अधिकारी, पदाधिकारी व मंडलाधिकारी यांनी केला असल्याचा आरोप आहे.
हरी शास्त्री व गुरु शास्त्री यांच्या नावाने अमल करून दोन नावाची व्यक्ती एकच दाखवून नावाचे प्रतिज्ञापत्र तयार करून पद्मनाभ हरिभाऊ श्रोत्रिय असे दाखवून दुय्यम निबंधक यांचेकडून काहीही एक कारण नसताना कोठेही संबंध नसताना सदरच्या व्यक्तीचे पुणे जिल्ह्यातील खेड मधील व्यक्ती दाखवून सदर जमीन विक्री केली.
वस्तुस्थिती अशी की, श्री विष्णू मंदिर खेड या ट्रस्टचे विश्वस्त यांनी शंभर रुपये च्या स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र लिहून देऊन त्यात पद्मनाभ शास्त्री गुरु हरी शास्त्री व पद्मनाभ हरिभाऊ श्रोत्रिय असे खोटे दस्तऐवज तयार करून संगनमताने वरील तहसीलदार अधिकारी यांनी 137 एकर जमीन लाटण्याचा उद्योग चालविलेला आहे.
ढवळपुरी येथील मंडल अधिकारी, तलाठी, तहसीलदार यांनी विष्णू नारायण देव ह्या नावाचे ट्रस्ट दाखवून या नावाचा आणि ढवळपुरीचा काहीही संबंध नसताना 137 एकर जमीन बनावट दस्तावेज बनविणार्याचे नावे केली, 20 कुळांची नावे कमी केली, या कामी 4 कोटी 11 लाखांचा आर्थिक व्यवहार झाला आहे असे कुळांचे म्हणणे आहे.