IMD Alert : चक्रीवादळ बुधवारपर्यंत येणार; IMD ने जारी केला ‘हा’ इशारा, ‘या’ राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस!

IMD Alert : देशात बदलत असलेल्या हवामानामुळे आता पुन्हा एकदा देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस हाहाकार माजवण्यासाठी तयार आहे. तर काही राज्यात थंडीची लाट सुरु झाली आहे. यातच आता येणाऱ्या दोन – तीन दिवसात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र लवकरच चक्री वादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे आणि हा चक्री वादळ बुधवारपर्यंत बंगालच्या उपसागरात पोहोचेल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या आंध्र प्रदेशात 8 डिसेंबर रोजी मुसळधार पाऊस पडणायची शक्यता आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो गुरुवारपर्यंत तामिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवर जोरदार वारे सुरू राहतील आणि शुक्रवारी दुपारपर्यंत पुद्दुचेरीमध्ये वादळाच्या प्रभावाखाली जोरदार पाऊस पडेल.

मच्छिमारांनी सावध राहण्याचा सल्ला  

IMD ने मच्छिमारांना पुढील काही दिवस (8 डिसेंबरपर्यंत) बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिला आहे. याशिवाय 7 ते 9 डिसेंबर या कालावधीत तामिळनाडू, पुद्दुचेरी, दक्षिण आंध्र प्रदेश किनारे आणि मन्नारचे आखात टाळण्याचा सल्लाही जारी करण्यात आला आहे.

IMD वर विश्वास ठेवला तर, या आठवड्याच्या अखेरीस कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्सचा जम्मू आणि काश्मीरवरही परिणाम होऊ शकतो. डिसेंबरच्या मध्यापर्यंत बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यानंतर तापमानात घट होऊ शकते.

या भागात पाऊस  

7 डिसेंबरच्या रात्रीपासून तामिळनाडूच्या सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुद्दुचेरी, कराईकल आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवरही 7 डिसेंबरला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर 4 डिसेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 6 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रात बदलण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 5 आणि 6 डिसेंबर रोजी लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबारमध्ये पाऊस पडू शकतो.

या दोन दिवसांत तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लगतच्या केरळ, माहे, दक्षिण आंध्र प्रदेश, दक्षिण आतील कर्नाटकात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात सकाळी धुके राहील.

हे पण वाचा :- IND vs BAN: अर्रर्र .. टीम इंडियाला आणखी एक धक्का! ICC ने केली ‘ही’ मोठी कारवाई; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण