IMD Alert : या ५ राज्यात आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Alert : सध्या देशभरातील लोकांना उष्णेतेपासून दिलासा मिळाला आहे. यंदा मान्सून चे (Monsoon) आगमन लवकरच झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. मात्र मान्सून चे आगमन झाले असले तरी काही जिल्हे अजूनही मान्सून च्या प्रतीक्षेत आहेत. तसेच काही राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

सध्या देशभरात विविध राज्यांमध्ये पाऊस (Rain) पडत आहे. उत्तर भारत ते दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसामुळे हवामानात बदल झाला आहे. आजपासून तीन दिवस किमान पाच राज्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने (Weather department) वर्तवला आहे. IMD ने यासंदर्भात अनेक ट्विट केले आहेत.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल (Climate change) होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 16 ते 18 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय आजपासून पश्चिम हिमालयीन भागातही पाऊस पडेल.

याशिवाय 17 जूनला जम्मू, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याची माहिती आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.

या राज्यांमध्ये 5 दिवस पावसाचा इशारा

गेल्या महिन्याच्या अखेरीस मान्सूनने केरळमध्ये धडक दिली होती. त्यानंतर ते इतर राज्यांकडे सरकत आहे. सध्या दक्षिणेकडील बहुतांश राज्यांमध्ये पाऊस पडत आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आजपासून पुढील पाच दिवस अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, आंध्र प्रदेश, केरळ, माहे, कर्नाटकातील किनारपट्टी भागात पुढील पाच दिवस पाऊस पडेल.

याशिवाय तेलंगणामध्ये १५ ते १७ जून, तामिळनाडूमध्ये १५ ते १८ जून, कर्नाटकात १६ ते १९ जून आणि गोव्यात १८ ते १९ जून दरम्यान पाऊस पडणार आहे.