IMD Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाची (Rain) जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर महिना सुरु झाला असला तरी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळतच आहे. परतीच्या पावसाला माघारी फिरण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तसेच बंगालच्या उपसागरावर नोरू चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे, अनेक राज्यात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) आणखी काही दिवस पाऊस सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्रातील (Maharashtra) सातारा, सांगली, पुणे आणि कोल्हापूर, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सदर जिल्ह्यांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार बेटे, गोवा आणि महाराष्ट्राचा काही भाग, तर दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक.
आज ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही मान्सून सक्रिय होण्यामागे एक हंगामी कारण आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ‘नोरू’ या सुपर चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे नैऋत्य मान्सून (Southwest Monsoon) देशातून माघार घेण्यास विलंब होणार आहे.
मान्सूनला उशीर झाल्याने तो सक्रिय राहील. त्यामुळे ५ ऑक्टोबरपासून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, दिल्ली आणि हरियाणाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.