अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- आधार कार्ड हे एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. आधार कार्डशी संबंधित फसवणूकीची प्रकरणे चर्चेत येत असतात. आधार कार्ड फक्त ओळखपत्र म्हणूनच वापरला जात नाही तर शाळेत प्रवेश घेण्यापासून ते सर्व सरकारी योजनांमध्येही याचा वापर केला जातो.
आधार कार्ड यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआईडीएआई) द्वारे जारी केले जाते. आधार कार्डसंदर्भात काही सतर्कता यूआयडीएआय वेळोवेळी जारी करते. युआयडीएआयने आधार कार्डधारकांना कुणालाही भाड्याने घर देण्यापूर्वी त्यांचा आधार पडताळण्यासाठी सतर्क केले आहे.
यूआयडीएआयच्या मते, प्रत्येक 12 अंकी क्रमांक हा आधार क्रमांक असत नाही. माहिती नसल्याने लोक भाडेकरूचा आधार वेरिफिकेशन करत नाहीत आणि नंतर काही चुकल्यास अडचणीचा सामना करावा लागतो.
आधार वेरिफाई करणे खूप सोपे आहे. यासाठी आपल्याला https://resident.uidai.gov.in/verify वर भेट द्यावी लागेल. त्यावर लॉग इन करा आणि नंतर 12 अंक प्रविष्ट करा. त्यानंतर कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल. असे केल्यावर, तुम्हाला प्रॉसीड टू व्हेरिफाई वर क्लिक करावे लागेल.
ह्या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर, 12 अंकी क्रमांकाची सत्यता दिसून येईल. याद्वारे, कार्डधारकाचा ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी आपण सहजपणे स्वत: ते पडताळणी करू शकता. हे फसवणूक टाळण्यास मदत करेल.