अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता गेली अनेक महिने राज्यातील मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली होती.
दरम्यान काही महिन्यांपूर्वीच मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली होती. जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र शिर्डी येथे साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली.
दरम्यान दर्शनासाठी भाविकांना पासची सक्ती करण्यात आली. मात्र आता शिर्डीला दर्शनाला जाण्यांपूर्वी एका महत्वाची माहिती समोर आली आहे.
शिर्डीतदेखील उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे शिर्डीत साईदर्शनाच्या शुल्क आणि मोफत दर्शन पासेसचं सकाळी 11 ते 4 दरम्यान वितरण बंद राहणार आहे.
दरम्यान शिर्डीतील साई शिर्डीतील साई मंदिरात दर्शनासाठी दररोज हजारो-लाखो भाविक येत असतात. सध्या शिर्डीतील तापमानाचा विचार करता. शिर्डी साईबाबाबा संस्थानाने महत्वाचा निर्णय घेतलाय.
राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानवाढ सुरू आहे. शिर्डीतदेखील उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे शिर्डीत साईदर्शनाच्या शुल्क आणि मोफत दर्शन पासेसचं सकाळी 11 ते 4 दरम्यान वितरण बंद राहणार आहे.
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने साई भक्तांना सकाळी 6 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 9:30 दरम्यान दर्शन पासेसचं वितरण केले जाणार आहे. पासेसच्या वितरण सुरू असताना साईभक्तांना दिवसभरातील कुठल्याही वेळेचा पास घेण्याची मुभा आहे.