शेतकऱ्यांसाठी महत्वाचे…त्या फळ पिकविमा योजनेचे नवे निकष जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- हवामान आधारित फळबाग पिक विमा योजनेमध्ये प्रमुख फळपिकांच्या धोके प्रमाणकेमध्ये बदल करण्यात आल्यामुळे फळपिक विमा काढूनही अवर्षण परिस्थिती अथवा अतिवृष्टीने फळबागांचे नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत होते.

त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान करणारी हि हवामान आधारित फळपिक विमा योजना रद्द करण्यात आली होती. आता या फळ पीकविमा योजनेचे नवे निकष जाहीर करण्यात आले आहे. सरकारने शासन निर्णय काढत पुढील तिन वर्षासाठी पिक विमा योजना, त्यांचे निकष व विमा कंपन्या जाहीर केल्या आहेत.

डाळिंब, पेरू आदी महत्वाच्या फळपिकांच्या परताव्याचे निकष बदलण्यात आले असुन डाळिंबसाठी १५ जुलै ते १५ ऑगस्ट व १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोंबर अशा दोन टप्प्यात पावसाचा खंड हा निकष लावण्यात आला आहे. तर १६ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान जास्त पावसाचा निकष आहे.

तसेच पेरू पिकासाठी १५ जुन ते १४ जुलै कमी पाऊस व १५ जुलै ते १५ ऑगस्ट पावसाचा खंड व जास्त तापमान हे निकष लावण्यात आले आहेत.

हे आहेत नवीन निकष पेरू :- १५ जुन ते १४ जुलै दरम्यान निकषांप्रमाणे कमी पाऊस झाल्यास किमान १२ हजार व कमाल ३० हजार परतावा व १५ जुलै ते १५ ऑगस्ट पावसाचा खंड व जास्त तापमान यामुळे नुकसान झाल्यास किमान बारा हजार व कमाल ३० हजार परतावा देण्यात येणार आहे.

डाळिंब : १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान निकषांप्रमाणे पावसाचा खंड राहील्यास किमान परतावा ५,९०० व कमाल १७,७००, व १६ ऑगस्ट ते १५ आक्टोबर पावसाचा खंड राहील्यास किमान परतावा १७,२०० व कमाल ४१,३०० मिळणार आहे. १

६ आक्टोबर ते ३१ डिसेंबर दरम्यान जास्त पावसाचा निकष असुन यामध्ये नुकसान झाल्यास कमाल भरपाई ११,८०० व कमाल ७१ हजार मिळणार आहे.

नवीन फळ पिक विमा योजना जाहीर झाली आहे. मात्र पेरू, दाक्ष, संत्रा पिकाची विमा भरण्याची मुदत संपली आहे. शासनाने पेरू सह ज्या पिकांची मुदत संपली अशा पिकांना ३० जुन पर्यत पिक विमा भरण्यास मुदत वाढ दिली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24